मुंबई, 30 नोव्हेंबर : निवृत्त पेन्शनधारकांच्या सोयीसाठी आता त्यांना त्यांच्या हयातीचा दाखला पोस्टमनकडूनही मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 70 रुपये शुल्क भरले की डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला मिळणार आहे. शासकीय सुविधा किंवा पेन्शन मिळवण्यासाठी दरवर्षी हयात प्रमाणपत्र जोडावे लागते. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना पोस्टामध्ये किंवा बँकेमध्ये जावे लागते. परंतु ही प्रक्रिया करताना अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांचे हाल होतात आणि म्हणूनच आता पोस्टमनच्या माध्यमातून सुद्धा हयातीचा दाखला डिजिटल पद्धतीने मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
काय येतात अडचणी?
वयोमानामुळे पेन्शनधारकांचे हातातील ठसे उमटत नाहीत व शेवटी त्यांच्या डोळ्यांचे स्कॅन करावे लागते. ही प्रक्रिया पेन्शन विभागांनी ज्या बँकांशी टायअप केले आहे. अश्याच बँकेतुन केली जाते मात्र कामाचा अतिरिक्त ताण व अत्याधुनिक सुविधेत होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे दाखला मिळवण्यात उशीर होतो.
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास स्कीम; दर महिन्याला मिळणार 9 हजार रुपये
बँकेच्या सर्व्हरमध्ये किंवा पोस्टाच्या सर्वर मध्ये बिघाड झाला तर महा- ई - सेवा केंद्र गाठावे लागते. त्यामुळे निवृत्त पेन्शन धारकांना या अडचणीना सामोरे जावं लागू नये यासाठी पोस्टाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कशासाठी लागतं प्रमाणपत्र
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन नियमित राहण्यासाठी हयात प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ही सेवा घरपोच देण्यात येणार आहे. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये फोन केल्यावर पोस्टमन तुमच्या घरी येणार आणि डिजिटल पद्धतीने कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला हयातीचा दाखला घरपोच मिळणार, अशी माहिती पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.