मराठी बातम्या /बातम्या /मनी /जेष्ठ नागरिकांसाठी खास स्कीम; दर महिन्याला मिळणार 9 हजार रुपये

जेष्ठ नागरिकांसाठी खास स्कीम; दर महिन्याला मिळणार 9 हजार रुपये

ज्येष्ठ नागरिकांसाठी 2017 मध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री वय वंदना ही योजना अतिशय चांगली मानली जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 2017 मध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री वय वंदना ही योजना अतिशय चांगली मानली जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 2017 मध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री वय वंदना ही योजना अतिशय चांगली मानली जात आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई : सेवानिवृत्तीनंतर आयुष्य कसं जगावं, हा अनेक लोकांसमोर प्रश्न असतो. त्यामुळे नोकरी किंवा कुठलाही व्यवसाय करताना उतारवयातील गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पैशांची तरतूद करून ठेवणं गरजेचं असतं.

  बाजारात अनेक पेन्शन योजना असून यात गुंतवणूक करूनही निवृत्तीनंतर सुखी जीवन जगता येऊ शकतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी 2017 मध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री वय वंदना ही योजना अतिशय चांगली मानली जात आहे.

  पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पंतप्रधान वय वंदना ही योजना उत्तम पर्याय आहे. यात गुंतवणूक करून दर महिन्याला पेन्शन मिळवता येईल. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा आणि नियमित उत्पन्न या दोन्ही गोष्टी मिळू शकतात.

  एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीनं ही योजना चालवली जाते. अनेक सरकारी, खासगी क्षेत्रातील तसेच बँकांनी पेन्शन योजना बंद केल्या असताना पंतप्रधान वय वंदना या योजनेची सुरूवात करण्यात आली.

  या योजनेत विमाधारकाला दरवर्षी 8 टक्के व्याजासह रिटर्न दिला जातो. विमा सुरू असेपर्यंत विमाधारक जिवंत राहत असेल तर पेन्शनच्या रुपात त्याला पूर्ण देय रक्कम दिली जाते. परंतु जर विम्याचा कालावधी पूर्ण होण्याच्या आधी विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची खरेदी रक्कम नॉमिनीला दिली जाते.

  कर्ज मिळवण्यासाठीही ही योजना बरीच लोकप्रिय आहे. विमा खरेदी केल्याच्या तीन वर्षांनंतर तुम्ही यावर सहज कर्ज घेऊ शकता. कर्ज घेताना वार्षिक 10 टक्क्यांपर्यंत व्याज घेतलं जाऊ शकतं. ही योजना ऑनलाइनही खरेदी करता येऊ शकते.

  15 दिवसानंतर ही योजना रद्द करता येते. एक लाख 62 हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतर पीएम वय वंदना योजनेतंर्गत 1000 रुपये पेन्शन मिळवता येईल. या योजनेत जास्तीतजास्त 9,250 पर्यंत पेन्शन मिळू शकते यासाठी 15 लाख रुपयांची गुंतवणूक करणं आवश्यक आहे.

  योजनेचा यांना घेता येईल फायदा

  वय वर्ष 60 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. कमाल वयोमर्यादाची कुठलीही अट ठेवण्यात आलेली नाही. योजना पूर्ण होण्याचा कालावधी 10 वर्षांचा आहे. यात मासिक, तिमाही, सहामाही तसेच वार्षिक आधारावर पेन्शन दिली जाते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर निवृत्तीनंतर ही योजना तुमच्या कामाला येऊ शकते. यातून दर महिन्याला तुम्हाला पेन्शन प्राप्त होईल.

  योजनेचा असा घेता येईल लाभ

  पंतप्रधान वय वंदना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास ऑनलाइन अर्ज सादर करावा लागतो. सर्वात आधी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘ऑनलाईन पॉलिसी खरेदी करा’ यावर क्लिक करावं. त्यानंतर ‘क्लिक हियर टू बाय’ या पर्यायाची निवड करावी.

  यात ‘पीएमव्हीव्हीवाय’ यावर क्लिक करावे व ऑनलाइन खरेदीचा पर्याय निवडून योजना घेता येऊ शकते. परंतु त्याआधी तुमची पूर्ण माहिती देण्याची आवश्यकता आहे. अर्जात सर्व माहिती भरल्यानंतर ‘पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करून दिलेला फॉर्म भरावा. आवश्यक ती सर्व कागदपत्रं अपलोड करून ऑनलाइन फॉर्म जमा करता येऊ शकतो व पॉलिसी खरेदी करता येऊ शकते.

  First published:

  Tags: Pension, Pension funds, Pensioners