जाहिरात
मराठी बातम्या / मनी / जानेवारीत किरकोळ महागाई वाढली! सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ

जानेवारीत किरकोळ महागाई वाढली! सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ

घाऊक महागाई झाली कमी

घाऊक महागाई झाली कमी

देशातील घाऊक महागाई दरात घसरण नोंदवण्यात आली असून जानेवारीमध्ये हा आकडा खाली आला आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत महागाई कमी होणे हे चांगले लक्षण आहे.

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: महागाई कमी होण्याचे नाव घेत नाहीये. घाऊक महागाई जानेवारीत 24 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. मात्र असे असले तरीही किरकोळ महागाईमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा केवळ 6 नव्हे तर साडेसहा टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जानेवारी 2023 मध्ये, किरकोळ महागाई दर मोठ्या वाढीसर 6.52 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर डिसेंबर 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 5.72 टक्के होता. जानेवारी 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 6.01 टक्के होता.

किरकोळ महागाई वाढण्याचे कारण काय?

किरकोळ महागाई वाढण्याची कारणे पाहिल्यास, जानेवारीमध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.94 टक्क्यांवर पोहोचला आहे. जो डिसेंबर 2022 मध्ये 4.19 टक्के होता. म्हणजे जानेवारीत खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. जानेवारी 2022 मध्ये खाद्यपदार्थांचा महागाई दर 5.43 टक्के होता. जानेवारी 2023 मध्ये महागड्या दुधाचा परिणाम किरकोळ महागाई दरावर दिसून येत आहे. दूध आणि त्यापासून बनवलेल्या प्रोडक्टचा महागाई दर 8.79 टक्के आहे. मसालेही महागले आहेत आणि हाच महागाई दर 21.09 टक्के आहे. तृणधान्ये आणि उत्पादनांचा महागाई दर 16.12 टक्के आहे. मांस आणि माशांच्या महागाईचा दर 6.04 टक्के आहे, तर अंडी 8.78 टक्के आहे. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर निगेटिव्ह असून तो -11.70 टक्के आहे. फळांचा भाव 2.93 टक्के होता. डाळींच्या महागाईचा दर 4.27 टक्के आहे. होम लोनचा EMI वाढला असेल तर नो टेंशन! हा पर्याय आहे बेस्ट

घाऊक महागाई झाली कमी

घाऊक महागाई डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीत 4.95% वरून 4.73% वर आली. महागाई दर 15 एप्रिल 2021 रोजीच्या नीचांकी पातळीवर आला आहे. एनालिस्ट इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग आणि कंस्ट्रक्शनमध्ये सप्लाय आणि डिमांड डायनामिक्सला ट्रॅक करण्यासाठी या संख्यांचा वापर करतात. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमध्ये इकॉनॉमिक एडव्हायजर WPI डेटा जारी करतात. WPI मध्ये झालेली वाढ अर्थव्यवस्थेतील चलनवाढीचा दबाव दर्शवते. SBI, HDFC, ICICI बँकेत अकाउंट आहे? ही माहिती असायलाच हवी

जानेवारीतील WPI महागाई दर -

फूड WPI 0.65% वरून 2.95% पर्यंत वाढला आहे. इंधन आणि उर्जा WPI 18.09% वरून 15.15% (MoM) वर घसरला आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट WPI 3.37% वरून 2.99% पर्यंत घसरला आहे. बटाट्याची घाऊक महागाई 22.38% वरून 9.78% वर आली आहे. कांद्याची घाऊक महागाई -25.97% वरून -25.20% झाली आहे. अंडी, मांसाची घाऊक महागाई 3.34% टक्क्यांवरून 2.23% टक्क्यांवर आली आहे. भाज्यांची घाऊक महागाई -35.9% वरून -26.48% पर्यंत आली आहे. तर नोव्हेंबरमधील सुधारित घाऊक महागाई दर 5.85% वरून 6.12% पर्यंत राहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: inflation
  • First Published :
जाहिरात
जाहिरात