मुंबई, 6 जानेवारी: रिलायन्स रिटेलनं (Reliance Retails) ऑनलाईन डिलिव्हरी सेवा (Online Delivery Service) पुरवणाऱ्या डुंजो (Dunzo) कंपनीत 24 कोटी डॉलर्स ($240 millions) म्हणजेच साधारण 1786 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. किराणा मालाची जलद होम डिलिव्हरी करणाऱ्या या उद्योगाचा वेग या गुंतवणुकीमुळे चांगलाच वाढणार आहे. डुंझो हा भारतातील स्टार्ट-अप क्षेत्रातील एक यशस्वी प्रयोग म्हणून नावाजला जातो आणि त्याचं मॉडेल अनेकजण फॉलो करत असल्याचं दिसतं.
25 टक्के हिस्सेदारी
रिलायन्स रिटेलनं डुंझो कंपनीत 25.8 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. या गुंतवणुकीमुळे डुंझोचं बाजारमूल्य वाढलं असून ते आता 80 कोटी डॉलरवर पोहोचलं आहे. कबीर बिश्वास यांनी 2016 साली या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीनं स्थापनेपासून आतापर्यंत निर्माण केलेल्या बाजारमूल्यापेक्षाही त्यात रिलायन्स रिटेलनं केलेली गुंतवणूक ही अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत या कंपनीनं स्वतःहून 14 कोटी डॉलर बाजारमूल्यापर्यंत झेप घेतली होती. त्यात रिलायन्स रिटेलच्या गुंतवणुकीमुळे 24 कोटी डॉलर्सची भर पडली आहे.
वाढणार डुंझोचा वेग
डुंझोचा वेग या गुंतवणुकीमुळे वाढणार असून बाजारातील प्रतिस्पर्ध्यांसोबत स्पर्धा करण्यासाठी अधिक बळ त्यांना मिळणार आहे. कंपनीचे संस्थापक कबीर विश्वास यांनी या डीलबाबत समाधान व्यक्त केलं आहे. आम्ही किराणा डिलिव्हरी क्षेत्रात अधिक सक्षमपणे आणि अचूकपणे काम करण्याचा प्रयत्न कंपनीच्या निर्मितीपासूनच करत आहोत. रिलायन्स परिवारातील एका कंपनीनं आमच्या कंपनीत गुंतवणूक करण्यात रस दाखवणं, हीच आमच्या उत्तम कामगिरीची पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या गुंतवणुकीनंतर नव्या जोमाने आपण बाजारात उतरू आणि भारतीय दुकान या संकल्पनेला नव्या उंचीवर नेऊन ठेऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हे वाचा -
किराणा बाजार क्षेत्रात रिलायन्स परिवारानं केलेली ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. रिलायन्स परिवाराच्या ‘जिओ मार्ट सर्व्हिस’व्यतिरिक्त डिलिव्हरी क्षेत्रातील ही एक लक्षवेधी गुंतवणूक ठरणार असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. गेल्या वर्षी रिलायन्सनं Milkbasket ही कंपनीदेखील विकत घेतली होती. या गुंतवणुकीसाठी डुंझो कंपनीची झोमॅटो, स्विगी आणि टाटा ग्रुपसोबतही चर्चा सुरू होती. मात्र त्याचं पुढं काहीच होऊ शकलं नाही आणि रिलायन्स रिटेलनं कंपनीतील 25 टक्के हिस्सा विकत घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business, Investment, Reliance group, Reliance Industries Limited