मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Home loan वर देताय अधिक व्याज तर जाणून घ्या कसा कमी कराल EMI, वाचा संपूर्ण कॅलक्यूलेशन

Home loan वर देताय अधिक व्याज तर जाणून घ्या कसा कमी कराल EMI, वाचा संपूर्ण कॅलक्यूलेशन

जर तुम्ही गृहकर्जावर अधिक व्याज भरत असाल तर, तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर सुविधेचा पर्याय निवडून ईएमआयचा (EMI) भार कमी करू शकता. वास्तविक, जर तुमची बँक गृहकर्जावर जास्त व्याज आकारत असेल तर तुमच्याकडे दुसरी बँक निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी: अनेक बँकांनी गृहकर्जाच्या (Home Loan Interest Rate) व्याज दरात बदल केला आहे. बॅलन्स ट्रान्सफरसाठीचे (Balance Transfer) शुल्कही कमी करण्यात आले आहे. जर तुम्ही गृहकर्जावर अधिक व्याज भरत असाल तर, तुम्ही बॅलन्स ट्रान्सफर सुविधेचा पर्याय निवडून ईएमआयचा (EMI) भार कमी करू शकता. वास्तविक, जर तुमची बँक गृहकर्जावर जास्त व्याज आकारत असेल तर तुमच्याकडे दुसरी बँक निवडण्याचा पर्याय उपलब्ध असतो. अशा स्थितीत तुम्ही तुमचे गृहकर्ज ट्रान्सफर करू शकता. हा पर्याय निवडून, तुम्ही केवळ ईएमआयचं ओझं कमी करू शकत नाही तर परतफेडीचा (Repayment) कालावधी देखील वाढवू शकता, असं जाणकार सांगतात.

टॉप-अपची सुविधा

गुंतवणूक सल्लागार स्विटी मनोज जैन यांनी सांगितलं की, 'या अंतर्गत कुणीही टॉप-अप सुविधा घेऊ शकतो. कारण याच्या वापरावर सहसा कोणतेही बंधन नसते. होम लोन ट्रान्सफरमध्ये कर्जाची पुनर्रचना करण्याची सुविधा उपलब्ध होते. याचा अर्थ असा की तुमच्या कर्ज परतफेडीच्या क्षमतेनुसार तुम्हाला परतफेडीचा कालावधी आणि ईएमआय कमी जास्त करता येतो'.

हे वाचा-Finance Tips : तुमच्या पैशाचं असं करा नियोजन? आर्थिक संकटात अडकणार नाही

सुविधेसाठी आवश्यक कागदपत्रं

जर तुम्हाला होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल, तर त्यासाठी ओळखीचा पुरावा आणि अ‍ॅड्रेस प्रुफसारखी केवायसी कागदपत्रे (KYC Documents) आवश्यक असतात. याशिवाय स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्यांच्या व्यवसायाची मागील दोन वर्षांची आर्थिक विवरणपत्रं आणि पाच वर्षांची व्यवसायातील सातत्य दर्शवणारी कागदपत्रं आवश्यक असतात. तर, नोकरदार वर्गासाठी चालू वेतन स्लिप आणि सहा महिन्यांचे बँक खाते स्टेटमेंट (Bank Account Statement) देणं आवश्यक आहे.

समजून घ्या बचतीचा हिशेब

समजा, तुमच्याकडे 12.5 लाखांचे गृहकर्ज बाकी आहे आणि ज्याचा परतफेड कालावधी 20 वर्ष आहे. सध्याची बँक तुमच्याकडून 6.70 टक्के दराने व्याज आकारत आहे. त्यानुसार तुम्हाला दरमहा 9467 रुपये EMI भरावा लागत आहे. अशा परिस्थितीत, इतर कोणतीही बँक तुम्हाला 6.45 टक्के दराने होम लोन बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा देत आहे. तुम्ही हा पर्याय निवडल्यास तुमचा दरमहा EMI 9283 रुपयांपर्यंत कमी होईल. अशा प्रकारे, तुम्ही संपूर्ण गृहकर्जावर 44,286 रुपये वाचवू शकता.

हे वाचा-Income Tax Alert : करदात्यांनी 'हे' महत्त्वाच काम करुन घ्या; उद्या शेवटचा दिवस

0.50 टक्क्यांनी स्वस्त असेल तरच निवडा पर्याय

स्विटी मनोज जैन यांच्या म्हणण्यानुसार, 'जेव्हा नवीन गृहकर्ज तुमच्या सध्याच्या दराच्या तुलनेत 0.25 ते 0.50 टक्के स्वस्त असेल तेव्हाच तुम्ही होम लोन बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडावा. याशिवाय, आता बहुतांश बँका डिजिटल (Digital) झाल्या आहेत. सर्व बँका आणि वित्तीय संस्था ग्राहकांना ऑनलाइन अर्जाचा पर्याय देतात. अशा स्थितीत, अर्जदारांनी टॉप-अप रक्कम, फ्लेक्सिबल परतफेड कालावधी, फोरक्लोजर शुल्कासहित अन्य माहिती देखील घेणं आवश्यक आहे.'

First published:

Tags: Home Loan, Sbi home loan