जाहिरात
मराठी बातम्या / मनी / RD की SIP : कोणत्या योजनेत बचत केल्यास मिळेल जास्त रक्कम?

RD की SIP : कोणत्या योजनेत बचत केल्यास मिळेल जास्त रक्कम?

RD की SIP : कोणत्या योजनेत बचत केल्यास मिळेल जास्त रक्कम?

लोकांची या गरजा लक्षात बॅंका, पोस्ट ऑफिस आणि वित्तीय संस्था सातत्याने निरनिराळ्या बचत योजना लॉंच करत असतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई: खासगी नोकरदारांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. त्यामुळे हा वर्ग नोकरी लागताच आर्थिक नियोजन सुरू करतो. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुखमय असावे, कार, घर खरेदी, मुलांचे उच्चशिक्षण आणि त्यांच्या विवाहासाठी पुरेसे पैसे जवळ असावेत हा या नियोजनामागील उद्देश असतो. यासाठी काही लोक निरनिराळ्या पेन्शन योजनांमध्ये बचत सुरू करतात. मात्र, लोकांची या गरजा लक्षात बॅंका, पोस्ट ऑफिस आणि वित्तीय संस्था सातत्याने निरनिराळ्या बचत योजना लॉंच करत असतात. सर्वसामान्यपणे सुरक्षित बचतीसाठी लोकांचा कल रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडी किंवा फिक्स्ड डिपॉझिट अर्थात एफडीकडे असतो. या योजनांमधून खात्रीशीर रिटर्न मिळतात. मात्र तुमची जर थोडी जोखीम पत्करायची तयारी असेल तर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यातून चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते. आरडी आणि एसआयपी या दोन्हीमध्ये नेमका फरक काय असतो, हे जाणून घेणं गरजेचं आहे. `झी न्यूज हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे. आजकाल गुंतवणूक आणि बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एक मोठा वर्ग आरडी आणि एफडीच्या योजनांमध्ये बचत करत असतो. यातून खात्रीशीर रिटर्न मिळतात. एफडीमध्ये तुम्हाला एक ठराविक रक्कम गुंतवता येते तर आरडीमध्ये तुम्हाला दरमहा निश्चित रक्कम भरावी लागते. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला यातून व्याजसह रक्कम मिळते. तुमची आर्थिक जोखीम घेण्याची तयारी असेल तर एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंड हे मार्केटच्या चढ-उतारावर अवलंबून असतात. या जोखमी असली तरी बहुतांश लोकांना यातून चांगले रिटर्न्स मिळतात. आरडी आणि एसआयपीमध्ये खूप फरक आहे. ``तुम्ही एसआयपी आरडीप्रमाणे कमी रकमेपासून सुरू करू शकता. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांसाठी आरडीत बचत सुरू केली तर त्यावर तुम्हाला वर्षाला 5.8 टक्के व्याज मिळते. मात्र एसआयपी मध्ये सरासरी 12 टक्क्यांच्या हिशोबाने व्याज मिळते. जर तुमचं नशीब चांगलं असेल तर 12 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळू शकतात. याशिवाय तुम्हाला एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचाही फायदा मिळतो,`` अशी माहिती अर्थविषयक तज्ज्ञ शिखा चतुर्वेदी यांनी सांगितले. एसआयपीविषयी बोलायचं झालं तर तुम्ही यात 5 वर्षांसाठी दरमहा 5000 रुपयांची बचत करू शकता. यात तुमची एकूण रक्कम 3,00,000 रुपये होईल. जर सरासरी 12 टक्क्यांच्या हिशेबानं व्याज मिळालं तर तुम्हाला 1,12,432 रुपये व्याजाच्या स्वरुपात मिळतील. याचाच अर्थ तुम्हाला 5 वर्षांत 4,12,432 रुपये मिळतील. जर तुम्हाला नशिबाची साथ मिळाली आणि 14 किंवा 15 टक्के दराने व्याज मिळालं तर दुप्पट रक्कम मिळू शकते. शिखा चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही 5 वर्षांसाठी दरमहा 5000 रुपयांची बचत पोस्ट ऑफिसमधील आरडीत सुरू केली तर तुम्हाला त्यासाठी 5.8 टक्के व्याज मिळेल.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार 5000 रुपये दरमहा बचत केल्यास 5 वर्षांत तुमची बचत एकूण 3,00,000 रुपये होईल. यावर 5.8 टक्के दराने 48,480 रुपये व्याज म्हणून मिळतील. याचाच अर्थ पाच वर्षांनंतर तुम्हाला 3,48,480 रुपये आरडीतून मिळतील. सद्यस्थिती पाहता तुमच्यासाठी आरडीच्या तुलनेत एसआयपीमध्ये केलेली बचत निश्चितच फायदेशीर ठरू शकते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात