नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर : रिझर्व बँक आणि केंद्र सरकार यांच्यात गेले काही दिवस बेबनाव सुरू होता. त्यावर प्रथमच सरकारकडून उत्तर देण्यात आलंय. 3.6 लाख कोटी रुपये सरकारने RBI कडे मागितलेले नाहीत. केवळ या केंद्रीय बँकेच्या आर्थिक ठेवींची व्यवस्था कशी करायची याबाबत चर्चा केली आहे, अशा अर्थाचं ट्वीट अर्थ मंत्रालयाचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी केलंय. RBI आणि सरकार यांच्यात वादविवाद सुरू असल्याच्या उलट सुलट बातम्या माध्यमांमधून येत आहेत.
माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काही काळापूर्वी सरकारवर आरोप केला होता की, वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकार रिझर्व बँकेवर दबाव टाकत आहे. रिझर्व बँक केंद्र सरकारला स्वतःच्या हाती ठेवू इच्छिते, असं चिदंबरम यांचं म्हणणं होतं.
गर्ग यांनी म्हटलंय की, राजकोषातला हिशोब अगदी व्यवस्थित आहे. सरकारनं रिझर्व बँकेला कुठल्याही रकमेची मागणी केलेली नाही. त्यांना कुठला प्रस्तावही दिलेला नाही. एकाच प्रस्तावावर सध्या सुरू आहे ते म्हणजे RBIच्या आर्थिक गणितांची व्यवस्था.
आर्थिक तूट सकल उत्पन्नाच्या ३.३ एवढीच सीमित ठेवायचा प्रयत्न आहे, असंही अर्थसचिवांनी सांगितलं.
आता अर्थसचिवांच्या वक्तव्यावरही चिदंबरम यांनी ट्वीट केलंय की, आताच आर्थिक व्यवस्थेची चर्चा करण्याचं काय कारण आहे. असा सवाल चिदंबरम यांनी सरकारवर टीका करताना केलाय.
VIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.