मुंबई, 23 सप्टेंबर : बँकेचे व्यवहार करताना अनेकदा फसवणुक होते. तर कधीकधी ऑनलाइन व्यवहार करताना खात्यातून पैसे जातात पण ज्याला पाठवायचे त्याला पोहचत नाहीत. डेबिट कार्ड किंवा एटीम व्यवहारातही नुकसान होतं. त्यानंतर केलेल्या तक्रारींची दखलही घेतली जात नाही. अशावेळी ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आता यावर रिझर्व्ह बँकेनं ठोस पावलं उचलली आहेत. ऑनलाइन व्यवहार करताना तो झाला नाही आणि पैसे गेले तर ते परत ग्राहकाला मिळेपर्यंत दर दिवशी बँकांनी संबंधित व्यक्तीला 100 रुपये द्यावे लागतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. टर्न अराउंड टाइमच्या नियमांत बदल केला आहे. या बदलानंतर बँकेच्या ग्राहकांना फेल ट्रान्झॅक्शनसाठी त्रास सहन करावा लागणार नाही. बँकेत तक्रार करूनही पैस न मिळाल्याची प्रकरणे वाढल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑनलाइन व्यवहार फेल झाला तर एका दिवसाच्या आत पैसे परत मिळायला हवेत. तसे न झाल्यास संबंधित बँकेकडून खात्यावर रिफंड मिळेपर्यंत दररोज 100 रुपये जमा करावेत असा आदेशच रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. UPI, IMPS, NACH यांच्या माध्यमातून व्यवहार केल्यावर हा नियम लागू असेल. रिझर्व्ह बँकेनं ऑनलाइन व्यवहारांशिवाय नॉन डिजीटल ट्रान्झॅक्शनसाठीही कालमर्यादा दिली आहे. एटीएम, मायक्रो एटीएमममध्ये फेल झालेल्या व्यवहारांच्या तक्रारींचे निवारण 5 दिवसांच्या आत करणं बंधनकारक आहे. अन्यथा बँकेला ग्राहकाच्या खात्यावर दररोज 100 रुपये जमा करावे लागतील. या नियमाचे पालन केले नाही तर ग्राहकांना रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करता येते. VIDEO: शिवच्या आईवर वीणाची जादू…सांगितला पुरणपोळीचा किस्सा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.