मराठी बातम्या /बातम्या /मनी /RBI Monetary Policy : RBI कडून रेपो रेट वाढवण्याबाबत मोठा निर्णय, EMI ही वाढणार

RBI Monetary Policy : RBI कडून रेपो रेट वाढवण्याबाबत मोठा निर्णय, EMI ही वाढणार

RBI

RBI

RBI Monetary Policy : होम लोन, कार लोन आणि पर्सनलोन महाग होणार आहेत. रेपो रेटमध्ये गेल्या मे महिन्यापासून ही सहाव्यांदा वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : व्हॅलेंटाईन डेआधी तुमचं बजेट बिघडणार आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे RBI ने पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बजेट आणि US फेडने वाढवलेल्या व्याजदरानंतर RBI ने हा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताची अर्थव्यवस्था सध्या बरी असल्याचं म्हटलं आहे. जागतिक बाजारपेठेत मंदीचे सावट असताना भारताची स्थिती त्या तुलनेत बरी आहे. महागाईवर अंशत: नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील RBI पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हरन शक्तीकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार RBI ने 0.25 बेसिस पॉईंट्सने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनलोन महाग होणार आहेत. रेपो रेटमध्ये गेल्या मे महिन्यापासून ही सहाव्यांदा वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

सहापैकी चार जणांनी बैठकीमध्ये रेपो रेट वाढवण्याच्या बाजूने मत दिलं आहे. त्यामुळे या बैठकीत रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली.

RBI ने रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंट्सने वाढ केली असून 6.50 वर रेपो रेट पोहोचला आहे. MSF दर 6.5 वरुन वाढून 6.75 वर पोहोचला आहे. SDF दर 6 टक्क्यांवरुन वाढून ६.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

First published:

Tags: EMI, Home Loan, Rbi, Rbi latest news