मुंबई : रेशन कार्डधार कांना सरकारने मोठा दणका दिला आहे. सरकारने मोफत रेशन योजनेच्या नियमात मोठे बदल केले. रेशन कार्डवर मिळणाऱ्या तांदळाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे राज्यातील जनतेला आता 1 किलो कमी तांदूळ मिळणार आहे. राज्य सरकारने बुधवारपासून तेलंगणात रेशनकार्ड बाळगणाऱ्या सुमारे 91.5 लाख कुटुंबांना मोफत तांदूळ वाटप सुरू केले आहे. लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला यंदा मार्चपर्यंत म्हणजेच पुढील तीन महिन्यांसाठी 5 किलो वजन देण्यात येणार आहे. सरकारने रेशनच्या नियमात बदल केला आहे. यापुढे तांदूळ (रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळ) वाटण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. राज्यातील नागरिकांसाठी तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतला आहे.
रेशनचं मोफत धान्य मिळवण्यात अडचण येतीये? ‘या’ क्रमांकांवर करा तक्रारनागरी पुरवठा मंत्री गांगुला कमलाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत पुरवठा करण्यात आलेल्या तांदळातील सॉफ्टवेअर अपडेटमुळे मे 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत 200 किलो ऐवजी 203 किलो तांदूळ देण्यात आला. 3 किलो अधिक तांदूळ दिले. ज्यामुळे राज्य सरकारने आता यावर्षी जानेवारी ते मार्च या पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा एक किलो कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलपासून मिळणार 6 किलो तांदूळ “एप्रिलपासून, आम्ही रेशन कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांना प्रति व्यक्ती 6 किलो तांदूळ वाटप पुन्हा सुरू करू. पीएमजीकेवाय अंतर्गत 54.48 लाख कुटुंबांना याचा फायदा होत आहे. याशिवाय राज्य सरकार स्वखर्चाने ९२ लाख लाभार्थ्यांना तांदूळ वाटप करत आहे.
गुडन्यूज! ‘या’ रेशनकार्डधारकांना मिळणार मोफत 21 किलो गहू अन् 14 किलो तांदूळ, पाहा डिटेल्सलॉकडाऊनच्या काळात सरकारने 1500 रुपये दिले केंद्र सरकारने कोविड-19 लॉकडाऊन काळात रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ दिला तर राज्य सरकारने अतिरिक्त दोन महिन्यांसाठी प्रत्येक कुटुंबाला 1,500 रुपये आणि स्थलांतरित कामगारांसाठी प्रति कुटुंब 500 रुपये दिले.