मुंबई, 23 डिसेंबर: सरकारच्या वतीनं ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत देशभरात मोफत धान्य (रेशन) वितरण केलं जात आहे. कोरोना महामारीच्या काळात या योजनेमुळे अनेकांना फार मोठा आधार मिळाला. मात्र, काही ठिकाणी गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नाही. तुम्हालाही रेशन मिळण्यात अडचणी येत असतील किंवा स्वस्त धान्य दुकानदाराकडून त्रास होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या काही नंबरवर कॉल करून सहज तक्रार करू शकता. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतील लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय मोफत रेशन मिळावं या साठी आवश्यक हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. घरबसल्या काढता येतं रेशनकार्ड- 1) तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचं असेल तर हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता. यासाठी तुम्हाला अन्न, पुरवठा आणि ग्राहक विभागाच्या ऑनलाइन पोर्टलवर जावं लागेल. 2) ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करा. 3) तिथे एनएफएसए 2013 अर्ज उघडा. 4) अर्जदाराशी संबंधित विचारलेली सर्व माहिती नमूद करा. 5) आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल, फोन बिल यांसारखा ओळखीचा पुरावा आणि तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो पोर्टलवर अपलोड करा. 6) अर्जाची फी जमा केल्यानंतर ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक करा. 7) अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपण दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल. 8) सर्व तपशील बरोबर आढळल्यानंतर आपल्याला रेशन कार्ड दिलं जाईल. हेही वाचा: नव्या वर्षात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, CNG-PNG आणि वीज स्वस्त होणार? तुमच्याकडे रेशन कार्ड असूनही धान्य मिळण्यास अडचणी येत असतील किंवा दुकानदार तुम्हाला धान्य देत नसेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता. दिल्लीतील रेशन कार्डधारक ईमेलद्वारेही तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी cfood@nic.in या मेल आयडीचा वापर करावा लागेल. यासोबतच http://fs.delhigovt.nic.in या अधिकृत वेबसाइटवरही ऑनलाइन तक्रार करता येईल. इतर राज्यांतील ग्राहक तक्रारीसाठी खालील क्रमांकाचा वापर करू शकतात. महाराष्ट्र- 1800224950 राजस्थान – 18001806127 गुजरात- 18002335500 मध्य प्रदेश- 07552441675, Helpdesk No.: 1967 / 181 उत्तर प्रदेश- 18001800150 उत्तराखंड – 18001802000, 18001804188 पश्चिम बंगाल – 18003455505 कर्नाटक- 18004259339 दिल्ली – 1800110841 जम्मू – 18001807106 काश्मीर – 18001807011 अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह – 18003433197 चंदीगड – 18001802068 दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव – 18002334004 लक्षद्वीप – 18004253186 पुदुच्चेरी – 18004251082 पंजाब – 180030061313 केरळ- 18004251550 मणिपूर- 18003453821 मेघालय- 18003453670 छ्त्तीसगड- 18002333663 गोवा- 18002330022 हरियाणा – 18001802087 हिमाचल प्रदेश – 18001808026 मिझोरम- 1860222222789, 18003453891 आंध्र प्रदेश – 18004252977 अरुणाचल प्रदेश – 03602244290 आसाम – 18003453611 बिहार- 18003456194 तेलंगाणा – 180042500333 त्रिपुरा- 18003453665 झारखंड – 18003456598, 1800-212-5512 नागालँड- 18003453704, 18003453705 ओदिशा – 18003456724 / 6760 सिक्किम – 18003453236 तमिळनाडू – 18004255901
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.