मुंबई, 27 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय सराफा बाजाराचा कल पाहता, देशांतर्गत वायदे बाजारात आज म्हणजेच सोमवार, 27 डिसेंबर 2021 रोजी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (Gold-Silver Price) अस्थिरता दिसून येत आहे. आज सकाळी सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या दरात घसरण झाली. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर (multi commodity exchange) सकाळी 9.26 वाजता, सोन्याचे वायदे 99 रुपये किंवा 0.21% ने वाढले आणि सोनं 48,218 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं. सोन्याचा सरासरी भाव (Gold Price Today) 48,179 रुपये होता. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सोन्याची क्लोजिंग प्राईज 48,119 रुपये होती. सराफा बाजारात आज सोन्या-चांदीमध्ये संमिश्र कल दिसून येत असून हा क्रम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. सोन्याचे भाव मर्यादेत व्यवहार करत असून गेल्या आठवड्यात चांदीमध्ये दिसलेली तेजी आज गायब झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही सोने आणि चांदी (Silver Price Today) संमिश्र भावाने व्यवहार करत आहेत. सोन्यामध्ये सुमारे 1 टक्क्यांची वाढ नोंदवली जात आहे. जागतिक बाजारात सोने 0.97 टक्क्यांच्या वाढीसह 1809.09 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, कोमेक्सवर 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह चांदी 22.75 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. केंद्र सरकारकडून मिळतोय 10 हजारांचा थेट लाभ, मार्चआधी ‘ही’ कामं करुन घ्या; काय आहे योजना ? सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. नवीन वर्षात होतायंत महत्त्वाचे बदल, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







