• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • फक्त 2 रुपयांचं एक नाणं तुम्हाला बनवेल लखपती; कसं ते वाचा सविस्तर

फक्त 2 रुपयांचं एक नाणं तुम्हाला बनवेल लखपती; कसं ते वाचा सविस्तर

Rare 2 Rs Coin : हे दुर्मिळ 2 रुपयांचं नाणं तुमच्याकडे आहे का पाहा.

 • Share this:
  मुंबई, 01 जुलै: कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आर्थिक चणचण भासते आहे. गंभीर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. लोक नोकरी शोधत आहेत. अशात घरी बसून तुम्हाला लखपती होण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला फक्त गरज आहे, 2 रुपयांच्या एका नाण्याची (2 Rupee coin). एक विशिष्ट प्रकारचं दोन रुपयांचं नाणं (Online auction of money) तुमच्याकडे असेल तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. अनेकांना जुन्या नोटा (Old currency note) आणि नाणी (Old coin) जमवण्याचा छंद असतो. केंद्र सरकारने काही नोटा आणि नाणी चलनातून बाहेर केल्या आहेत. त्यामुळे अशी करन्सी आता दुर्मिळ आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यांचा लिलाव होतो. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर का लिलाव केला जातो. सध्या चर्चेत आहे ते दोन रुपयांचं नाणं. हे वाचा - Flipkart चे सह-संस्थापक सचिन बन्सल देत आहेत कमाईची सुवर्णसंधी, वाचा सविस्तर देशात 1982 साली पहिलं 2 रुपयांच नाणं आलं. त्यावेळी हे नाणं कप्रो-निकेल मेटलने बनवण्यात आलं होतं. पण एक खास प्रकारचं दोन रुपयांचं नाणं तुमच्याजवळ आहे का पाहा. हे नाणं  1994, 1995, 1997 आणि 2000 सीरीजमधील हवं. जर या वर्षातील नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल. लोक अशा नाण्यासाठी लाखो रुपये देण्यासाठीही तयार आहेत. तुम्ही या नाण्याची ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री करू शकता. क्विकर (Quikr) वेबसाईटवर या नाण्याचा लिलाव करू शकता. या वेबसाइट्सवर तुमचं नाणं विकण्यासाठी सर्वात आधी विक्रेता म्हणून स्वतःची नोंदणी करा. त्यानंतर तुमच्या नाण्याचा फोटो काढून तो वेबसाइटवर अपलोट करा. त्यानंतर तुमचा पत्ता, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी द्या. वेबसाइट तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करेल. त्यानंतर ग्राहक थेट तुमच्याशी संपर्क करतील. हे वाचा - एका वर्षात गुंतवणुकदारांना केलं लखपती; या शेअरद्वारे चांगल्या कमाईची संधी याशिवाय ईबे (Ebay) आणि क्लिक इंडिया (Click India) या वेबसाइट्सवरही अशी दुर्मिळ नाणी आणि करन्सी नोटा अनेकांना हव्या असतात. तुम्ही या वेबसाइट्सवरही स्वतःचं नशीब आजमावू शकता. (सूचना - ही बातमी वेबसाइट्समार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही.)
  Published by:Priya Lad
  First published: