नवी दिल्ली, 24 जून : भारतातील कोट्यवधी लोक रोज ट्रेनने प्रवास करतात. अशा वेळी भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेत असते. रेल्वे टेक्नॉलॉजी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रवास सुरक्षित आणि आरामदायी करण्याचा प्रयत्न करत असते. कारण कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत हा विषय आहे. ट्रेन चालवताना कोणकोणती टेक्नॉलॉजी आणि पद्धती वापरल्या जातात हे जाणून घेण्यास लोक खूप उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला असेच एक मजेदार रेल्वे नॉलेज देणार आहोत.
रेल्वेमध्ये एकाच ट्रॅकवर दोन गाड्या धावत असतील तर त्यात किती अंतर ठेवले जाते हे तुम्हाला माहीत आहे का? अंतर ठेवलं जातं कारण दोन गाड्या एकमेकांवर आदळू नयेत. यासाठी कोणती टेक्नॉलॉजी अवलंबली जाते? लोको पायलटला दुसरी ट्रेन मागून येत असल्याची माहिती कशी मिळते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या सिस्टमचा केला जातो वापर गाड्यांचे अंतर मेनटेन करण्यासाठी दोन सिस्टमचं पालन केलं जातं. Absolute Block System आणि Automatic Block Working. अॅबसोल्युट ब्लॉक सिस्टीम अंतर्गत दोन गाड्यांमध्ये 6 ते 8किलोमीटरचं अंतर ठेवलं जातं. ट्रेन एक स्टेशन सोडून दुसऱ्या स्टेशनवर पोहोचल्यावर स्टेशन मास्टर आधीच्या स्टेशन मास्टरांना फोन करून माहिती देतात. काहीवेळा स्थानकाचे अंतरही 10 ते 15 किलोमीटर असते, अशा स्थितीत गाडी निघायला थोडा वेळ लागतो. मात्र, आता सर्वच ठिकाणी ऑटोमेटिक ब्लॉक वर्किंग सिस्टम लागू करण्यात आली आहे. Railway Facts: विजेवर चालणाऱ्या लोखंडाच्या ट्रेनमध्ये का उतरत नाही करंट? इंट्रेस्टिंग आहे कारण ऑटोमॅटिक ब्लॉक वर्किंग काय आहे? रेल्वेच्या सामान्य नियमानुसार, जेथेही ऑटोमॅटिक सिग्नलिंग ब्लॉक सेक्शन आहेत. तेथे एकाच वेळी सिग्नलच्या आधारे एकाच मार्गावर एकापेक्षा जास्त ट्रेनचे सुरक्षित ऑपरेशन केले जाते. ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टीममध्ये सर्व सुरक्षिततेच्या नियमांनुसार एकाच ट्रॅकवर दोनपेक्षा जास्त गाड्या ठराविक अंतराने धावतात. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामध्ये ट्रॅक्सच्या बाजूला असलेल्या बॉक्समधून ऑटोमॅटिक सिग्नल चालवला जातो, ज्यामुळे लोको पायलटला सिग्नल मिळतो. IRCTC चं खास टूर पॅकेज! स्वस्तात करुन या अयोध्या, काशी आणि गयाची सैर ट्रेन एका सिग्लनवरुन क्रॉस होताच तेव्हा तो सिग्नल लोकोमोटिव्ह गेल्यानंतर लगेच लाल होतो. तसंच जेव्हा ट्रेन दुसरा सिग्नल क्रॉस करेल, तेव्हा मागचा सिग्नल पिवळा होतो. यानंतर, ट्रेन तिसरा सिग्नल ओलांडताच, मागील सिग्नल डबल पिवळा लाइट दाखवतो. म्हणजे मागून येणारी ट्रेन ताशी 50 किमी वेगाने धावू शकते.