मुंबई, 24 जुलै : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांचे कर्जाचे व्याजदर वाढले. सोबतच बँकांनी आपले फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर देखील वाढवले. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेने FD वर दुसऱ्यांदा व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्यानंतर पीएनबीच्या ग्राहकांना दुसऱ्यांदा फायदा झाला आहे.
PNB ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD योजनेवरील व्याज वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन व्याजदर 20 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत. पंजाब नॅशनल बँक बँकेने 7 ते 45 दिवसांत मॅच्युअर होणार्या एफडीवर त्यांचे व्याजदर 3 टक्क्यांवर स्थिर ठेवले आहेत. आता बँक 46 ते 90 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 3.25 टक्के व्याज देईल. 91 ते 179 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 4 टक्के व्याज देणार आहे. तर 180 दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी मुदतीच्या FD वर 4.50 टक्के व्याज द्यावे लागेल. बँक एका वर्षात मुदत ठेवींवर 5.30 टक्के व्याजदर देत राहील.
Cibil Score : चांगला पगार असूनही बँकेनं कर्ज नाकारलं? ’हे’ एक काम मिळवून देईल लोन
बँकेने एक वर्षापेक्षा जास्त आणि एक वर्षापर्यंतच्या मुदतीच्या FD वर 15 बेसिस पॉईंट्सनी वाढ करत व्याजदर 5.45 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 5.50 टक्के व्याजदर देत राहील. 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवून तो 5.75 टक्के केला आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुदतीच्या FD वर 5.60 टक्के व्याजदर असेल. बँकेने 1111 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवून 5.75 टक्के केला आहे.
ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील बँका 11 दिवस बंद; आर्थिक कामांचं नियोजन करण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची यादी
अनेक बँकांनी एफडीचे दर वाढवले
अलीकडे एसबीआय, अॅक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब आणि सिंध बँक, आयडीबीआय बँक इत्यादींनी त्यांच्या एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे. रिझव्र्ह बँकेने मे आणि जूनमध्ये सलग दोन महिने रेपो रेट 0.90 टक्क्यांनी वाढवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fixed Deposit, Investment, Money, Pnb