Property Rule: देशात जमीन ही अजुनही गुंतवणुकीचं प्रसिद्ध साधन आहे. हे फक्त गुंतवणुकीसाठीच नाही तर आर्थिक स्थैर्य आणि अनेक समाजांमध्ये रुबाब दर्शवत असते. यामुळेच भारतातील गावं किंवा शहरांमध्ये सोन्या व्यतिरिक्त जमिनीच्या संपत्तीला खूप सन्मान मिलतो. मात्र भारतात एक व्यक्ती किती कृषी योग्य जमीन खरेदी करु शकतो हे तुम्हाला माहितीये का? आज आपण याच प्रॉपर्टी रुल विषयी जाणून घेणार आहोत. जमीन खरेदीसाठी राज्यांचे वेगवेगळे नियम आहेत. बहुतांश राज्यांमध्ये यावर मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र, बिगरशेती जमिनीबाबत असा कोणताही नियम दिसत नाही. उदाहरणार्थ, हरियाणामध्ये तुम्ही कितीही बिगरशेतीयोग्य जमीन खरेदी करू शकता. तथापि, आज आपण केवळ कृषी जमिनीविषयीच चर्चा करणार आहोत. विविध राज्यांची मर्यादा वेगळी भारतातील जमीनदारी व्यवस्था संपुष्टात आल्यानंतर अनेक बदल करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर काही बदल करण्यात आले, तर काही अधिकार राज्यांना देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक राज्यात जमीन खरेदीची कमाल मर्यादाही वेगळी असते. यासोबतच शेतजमीन कोण विकत घेऊ शकते हे देखील राज्यच ठरवते. काही राज्ये आणि जमीन खरेदी मर्यादा केरळमध्ये जमीन दुरुस्ती कायदा 1963 अंतर्गत, विवाहित नसलेली व्यक्ती केवळ 7.5 एकरपर्यंत जमीन खरेदी करू शकते. त्याच वेळी, 5 सदस्यांचे कुटुंब 15 एकर जमीन खरेदी करू शकते. महाराष्ट्रातील लागवडीयोग्य जमीन ही ज्यांची आधीच शेती आहे तेच विकत घेतील. येथे कमाल मर्यादा 54 एकर आहे. पश्चिम बंगालमध्ये जास्तीत जास्त 24.5 एकर जमीन खरेदी करता येईल. हायवेपासून किती अंतरावर असावं घर? फॉलो केला नाही नियम तर सापडू शकता अडचणीत हिमाचल प्रदेशात 32 एकर जमीन खरेदी करता येईल. तुम्ही कर्नाटकातही 54 एकर जमीन खरेदी करू शकता आणि इथेही महाराष्ट्राचा नियम लागू आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक व्यक्ती जास्तीत जास्त 12.5 एकर लागवडीयोग्य जमीन खरेदी करू शकते. बिहारमध्ये केवळ 15 एकरपर्यंत शेती किंवा बिगरशेती जमीन खरेदी करता येते. त्या व्यवसायात गुंतलेले लोकच गुजरातमध्ये शेतजमीन खरेदी करू शकतात. Property Rule : फक्त रजिस्ट्री केल्याने घर-जमिनीचे मालक होत नाही, ‘हे’ डॉक्यूमेंट देतात मालकी हक्क! हे लोक शेतजमीन विकत घेऊ शकत नाहीत अनिवासी भारतीय किंवा परदेशी नागरिक भारतात शेतीयोग्य जमीन खरेदी करू शकत नाहीत. त्याला फार्म हाऊस किंवा वृक्षारोपण मालमत्ताही खरेदी करता येत नाही. मात्र, कुणाला त्यांना वारसा हक्काने जमीन द्यायची असेल तर ते देऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.