मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Voter ID: मतदार ओळखपत्र बनवणं झालं खूपच सोपं, फक्त ‘या’ लिंकवर जा अन् अर्ज करा

Voter ID: मतदार ओळखपत्र बनवणं झालं खूपच सोपं, फक्त ‘या’ लिंकवर जा अन् अर्ज करा

Voter ID: मतदार ओळखपत्र बनवणं झालं खूपच सोपं, फक्त ‘या’ लिंकवर जा अन् अर्ज करा

Voter ID: मतदार ओळखपत्र बनवणं झालं खूपच सोपं, फक्त ‘या’ लिंकवर जा अन् अर्ज करा

Apply For Voter ID Card: मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करणं खूपच सोपं आहे. त्यासाठी तुमच्याकडं ते बनवण्यासंबंधी सर्व कागदपत्रं असणं आवश्यक आहे.

    मुंबई, 3 ऑगस्ट: तुम्हाला मतदार कार्ड बनवायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता मतदान कार्ड काढण्यासाठी पूर्वीप्रमाणे कार्यालयांच्या फेऱ्या मारायची किंवा मोठमोठ्या रांगेत उभं राहण्याची गरज नाही. कारण हे काम आता तुम्ही घरबसल्या फक्त एका लिंकवर क्लिक करून करू शकता. मतदार कार्ड आहे ओळखीचा पुरावा - मतदार ओळखपत्र हे तुमची ओळख पटवून देणारं महत्त्वाचं कागदपत्रं आहे. यासोबतच आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी ते आवश्यक आहे. आतापर्यंत मतदानकार्ड बनवण्यासाठी लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, परंतु आता हे काम अगदी सोपं झालं आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटद्वारे, काही सोप्या स्टेप्सद्वारे, तुम्ही घरी बसून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. 10 दिवसात मिळू शकते कार्ड- यासाठी तुम्हाला फक्त निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जावं लागेल. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, तुमचं मतदार ओळखपत्र फक्त 10 दिवसांत तुमच्या घरी पोहोचवले जाईल. मात्र, अर्ज करताना तुमच्याकडे त्यासंबंधीची सर्व कागदपत्रं असणं आवश्यक आहे. फॉर्म 6 डाउनलोड करण्यासाठी किंवा ऑनलाइन भरण्यासाठी वेबसाइटवर लॉग इन करा. हेही वाचा-तुम्ही घरात किती कॅश अन् सोनं ठेवू शकता? कधी पडू शकतो आयकर विभागाचा छापा? जाणून घ्या सविस्तर या सोप्या स्टेप्समध्ये पूर्ण करा प्रक्रिया -
    • भारतीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India-ECI) वेबसाइटवर जा.
    • मुख्यपृष्ठावर, राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर (National Voters Services Portal) क्लिक करा.
    • आता ऑनलाइन अर्ज करा विभागात Registration of New Voter वर क्लिक करा.
    • फॉर्म-6 डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
    • भरलेल्या फॉर्ममध्ये प्रविष्ट केलेली सर्व माहिती एकदा तपासा आणि ती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
    • यानंतर तुम्ही एंटर केलेल्या ई-मेल आयडीवर एक लिंक मिळेल.
    • या लिंकद्वारे तुम्ही मतदार ओळखपत्र अर्जाची स्थिती सहजपणे ट्रॅक करू शकाल.
    काही मिनिटांत घरी बसून अर्ज करा- ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते. अशा प्रकारे अर्ज केल्यानंतर तुमचे मतदार ओळखपत्र मिळण्यासाठी किमान एक आठवडा आणि कमाल एक महिना लागू शकतो. लक्षात ठेवा की ऑनलाइन अर्ज करताना, फॉर्म काळजीपूर्वक निवडा.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Election commission, Voting

    पुढील बातम्या