मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त एक मिस्ड कॉल आणि झटक्यात मिळणार Loan

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त एक मिस्ड कॉल आणि झटक्यात मिळणार Loan

एका मिस्ड कॉलवर मिळणार कर्ज

एका मिस्ड कॉलवर मिळणार कर्ज

बँकांनीही शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. या भागात पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांना मिस्ड कॉलवरच कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: आता शेतकऱ्यांना चिंता करण्याचं कारण नाही. फक्त एक SMS किंवा मिस्ड कॉलवर लोन मिळणार आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू केली आहे.कर्ज, अनुदानापासून ते शेतीच्या वेगवेगळ्या यंत्रांसाठी सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे.

बँकांनीही शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. या भागात पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांना मिस्ड कॉलवरच कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या अर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे. कर्जाच्या अर्जाबाबत बँकेने म्हटलं की, कृषी कर्जासाठी अर्ज कसा करावा? याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे.

सरकारच्या 10 योजना शेतकऱ्याला मिळवून देतील मोठा फायदा

कसा करायचा अर्ज?

पंजाब नॅशनल बँकेने देशातील शेतकऱ्यांसाठी कर्जाची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. यामध्ये शेतकरी अतिशय सोप्या आणि माफक अटींवर अर्ज करून शेतीसाठी कर्ज घेऊ शकतात. 56070 या नंबरवर Loan लिहून SMS करायचा आहे. या व्यतिरिक्त 18001805555 किंवा 18001802222 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.

नेटबँकिंगद्वारे देखील तुम्ही कृषी कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी PNB बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला कृषी कर्जासाठी अर्ज करावा लागेल. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.

Crop Insurance : पिकांचं नुकसान झाल्यास सरकार करणार भरपाई, फक्त करा हे एक काम

कृषी सिंचन योजनेत शेतकऱ्यांना शेतीचा विस्तार, पाण्याची बचत आणि सिंचनाचे आधुनिक तंत्र आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेत ठिबक व फाऊंटन सिंचन तंत्रज्ञानावरही शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. अधिक माहितीसाठी शेतकरी https://pmksy.gov.in/ अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

First published:

Tags: Bank services, Farmer, Modi government, Pnb bank