जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PPF: दररोज करा 250 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा लाखो रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PPF: दररोज करा 250 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा लाखो रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PPF: दररोज करा 250 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा लाखो रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

तुम्ही नियमितपणे पीपीएफ अकाऊंटमध्ये दररोज 250 रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर 62 लाख रुपये मिळू शकतात. मुलांचे शिक्षण, लग्न किंवा आर्थिक संकटांमध्ये याचा वापर करता येईल.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय (risk) गुंतवणूक (investment) करायची असेल, तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा सर्वोत्तम पर्याय (Benefits of PPF) ठरू शकतो. यामध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला चांगले रिटर्न (good returns) मिळू शकतात. या योजनेत सलग 15 वर्षे गुंतवणूक केली जाते. या कालावधीत पैशांची गरज नसल्यास, गुंतवणुकीचा कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येतो. पीपीएफमध्ये गुंतवणूक करण्यात येत असलेल्या रक्कमेबाबत संपूर्ण सुरक्षिततेची हमी सरकारकडून (government) दिली जाते. त्यामुळे या गुंतवणुकीत कोणताही धोका नाही. तुम्ही नियमितपणे पीपीएफ अकाऊंटमध्ये दररोज 250 रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर 62 लाख रुपये मिळू शकतात. मुलांचे शिक्षण, लग्न किंवा आर्थिक संकटांमध्ये याचा वापर करता येईल. चांगला व्याजदर पीपीएफवरील व्याजदर 7 ते 8 टक्के असतो. सध्या पीपीएफ अकाऊंटवर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज मिळते. ही रक्कम अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा जास्त आहे. एका आर्थिक वर्षात यामध्ये कमीतकमी 500 रुपये किंवा जास्तीतजास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. ही योजना 15 वर्षांसाठी आहे. यानंतर, तुम्ही पैसे काढू शकता किंवा तुम्हाला दर 5 वर्षांसाठी योजनेची मुदत वाढवता येईल. गुंतवणुकीचं असं आहे गणित जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या पीपीएफ अकाऊंटमध्ये 15 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले, तर त्याला सध्याच्या व्याजदरानुसार 41 लाख रुपये मिळतील. याशिवाय, जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून दररोज 250 रुपये पुढील 25 वर्षे म्हणजे वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 62.5 लाख मिळतील. विशेष म्हणजे या पैशावर कोणताही टॅक्स लागणार नाही, आणि एकूण व्याज सुमारे 40 लाख रुपयांपर्यंत असेल. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा सेवानिवृत्तीसाठी टॅक्स फ्री फंड तयार करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. तुम्हाला म्युच्युअल फंडासारख्या जास्त रिटर्न देणाऱ्या गुंतवणुकीवर टॅक्स भरावा लागतो. पण पीपीएफमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम ही टॅक्स फ्री असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही योजना आकर्षक ठरतेय. एका आर्थिक वर्षात यामध्ये कमीतकमी 500 रुपये किंवा जास्तीतजास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. तुम्ही नियमितपणे पीपीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळू शकते. त्यामुळे निवृत्तीनंतरचे जीवन हे आर्थिकदृष्ट्या सुखकर होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात