मराठी बातम्या /बातम्या /मनी /पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती?

पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती?

अनेक जण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून बचत करण्यास प्राधान्य देतात. यामागे आपल्या रकमेबाबत खात्री हा एकमेव उद्देश असतो. त्यामुळे जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) सेव्हिंग्ज अकाऊंट (Savings Account)असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 19 एप्रिल : अनेक जण पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून बचत करण्यास प्राधान्य देतात. यामागे आपल्या रकमेबाबत खात्री हा एकमेव उद्देश असतो. त्यामुळे जर तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) सेव्हिंग्ज अकाऊंट (Savings Account)असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. अर्थ मंत्रालयाने किमान अकाऊंट बॅलन्सच्या चार्जेसबाबत काही बदल केले आहेत. याबाबत 9 एप्रिलला अर्थ मंत्रालयाकडून नोटीफिकेशन (Notification)जारी करण्यात आले आहे. या नोटिफिकेशनुसार, खातेदारानं किमान बॅलन्स (Minimum Balance)खात्यावर ठेवला नाही, तर करण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम घटवून निम्म्यावर आणण्यात आली आहे.

  आता किती असेल दंडाची रक्कम?

  पोस्ट आफिस म्हणजेच टपाल कार्यालयातील तुमच्या सेव्हिंग्ज अकाऊंटमध्ये किमान बॅलन्स नसेल तर 100 रुपये मेंटेनन्स चार्ज व जीएसटी आकारण्यात येत होता. ही रक्कम तुमच्या खात्यातून आपोआप कापली जात असे. तसेच तुमच्या अकाऊंटचा बॅलन्स झीरो झाला तर ते खाते आपोआपच बंद होते.

  ही आहे किमान बॅलन्सची मर्याद

  मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पोस्ट ऑफिसने किमान बॅलन्सची मर्यादा 500 रुपये केली होती. पोस्ट ऑफिसने ट्वीट करत सांगितले की नव्या नियमानुसार ग्राहकांना पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाऊंटमध्ये 11 डिसेंबरपर्यंत 500 रुपये इतका किमान बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे.

  सेव्हिंग अकाऊंटवर मिळते वर्षाला 4 टक्के व्याज

  इंडिया पोस्ट च्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाऊंटवर वर्षाला व्याज दर (Interest Rate)4 टक्के आहे. या व्याजाचा हिशोब महिन्याच्या 10 तारखेला आणि महिना अखेरीला किमान बॅलन्स किती आहे, यानुसार केला जातो. ग्राहक हे खातं आपल्या सोयीनुसार जवळील पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकतात.

  पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्याचे हे आहेत नियम

  पोस्ट आफिसमध्ये सेव्हिंग्ज खाते एकटी प्रौढ व्यक्ती किंवा दोन प्रौढ व्यक्ती संयुक्तपणे तसेच पालकांच्या वतीने एखादी अल्पवयीन व्यक्ती संयुक्तपणे उघडू शकते. 10 वर्षांवरील वय असणारे अल्पवयीन देखील हे खातं सुरु करु शकतात. केवळ एक व्यक्तीही पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाऊंट (Post Office Savings Account)उघडू शकते. अल्पवयीन किंवा मानसिक आजार असणारी केवळ एक व्यक्तीच हे अकाऊंट उघडू शकते. हे सेव्हिंग्ज अकाऊंट सुरु करताना नॉमिनी किंवा वारसदार असणे आवश्यक आहे.

  First published:
  top videos

   Tags: Interest limit, Penalty charges, Post office balance, Post office facility, Post office saving