जाहिरात
मराठी बातम्या / मनी / RD VS SIP: 5 हजारांची पोस्ट ऑफिस RD की SIP? 5 वर्षात कुठे मिळेल जास्त फायदा?

RD VS SIP: 5 हजारांची पोस्ट ऑफिस RD की SIP? 5 वर्षात कुठे मिळेल जास्त फायदा?

आरडी की एसआयपी काय आहे बेस्ट?

आरडी की एसआयपी काय आहे बेस्ट?

RD VS SIP: तुम्हाला दरमहा 5 हजार रुपयांची गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस आरडी की एसआयपी दोन्हीपैकी कोणता पर्याय जास्त फायदेशीर असेल जाणून घेऊया…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

RD VS SIP: एक जुलैपासून पोस्ट ऑफिस आरडीच्या व्याजदरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता या सरकारी स्किममध्ये 6.5 टक्केच्या हिशोबाने व्याज मिळतंय. जो यापूर्वी 6.2 एवढं होतं. म्हणजेच पोस्ट ऑफिस आरडीवर आता पहिल्यापेक्षा जास्त फायदा मिळेल. पोस्ट ऑफिस आरडी 5 वर्षांसाठी असते आणि यामध्ये गॅरंटीड व्याजही मिळतं. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गुंतवणुकीसाठी RD ऐवजी म्युच्युअल फंड देखील निवडू शकता. आजकाल बरेच लोक म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे पैसे गुंतवतात. यामध्ये तुम्हाला जास्त व्याज मिळेल, पण किती मिळेल, याची शाश्वती नाही कारण ही स्किम मार्केटशी लिंक्ड आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, पोस्ट ऑफिस RD आणि SIP दोन्हीमध्ये तुम्हाला जास्त नफा कुठे मिळेल? जेणेकरून तुम्ही कुठे गुंतवणूक करावी हे ठरवू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

5000 रुपयांच्या RD मध्ये किती पैसे मिळतील? समजा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दरमहा 5000 रुपयांची RD सुरू केली. तर तुम्ही एका वर्षात 60,000 रुपये आणि 5 वर्षांत एकूण 3,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल. 6.5 नुसार, तुम्हाला या गुंतवलेल्या रकमेवर एकूण 54,957 रुपये व्याज म्हणून मिळतील. त्याच वेळी, मॅच्योरिटीवेळी, जमा रक्कम आणि व्याजाच्या रकमेसह एकूण 3,54,957 रुपये मिळतील. 5000 रुपयांच्या SIP मध्ये किती नफा होतो? आता SIP जाणून घेऊया. तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक तेवढीच असेल जी तुम्ही RD मध्ये गुंतवणूक कराल. पण यामध्ये नफा जास्त होईल. साधारणपणे SIP मध्ये सरासरी 12 टक्के रिटर्न मिळते. अशा वेळी 3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर, तुम्हाला 1,12,432 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 4,12,432 रुपये मिळतील. जर तुम्ही व्याजाच्या संदर्भात तुलना केली, तर एसआयपीमध्ये मिळणारे व्याज आरडीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे. तुमचं नशीब चांगलं असेल आणि नफा चांगला मिळत असेल तर मॅच्युरिटी रक्कम जास्त असू शकते. LIC ची जबरदस्त स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा पेन्शन! हे देखील जाणून घ्या RD मध्ये, तुम्ही स्किम एकदा सुरू केली असेल. तर तुम्हाला सलग 5 वर्षे दरमहा ठराविक रकमेचा हप्ता भरावा लागेल. यामध्ये, तुम्ही मॅच्योरिटीपूर्वी रक्कम काढू शकत नाही. आवश्यक असल्यास, खाते उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनंतर तुम्ही ते कधीही बंद करू शकता. पण जर तुम्ही हे खाते मॅच्युरिटी कालावधीच्या एक दिवस आधी बंद केले तरीही तुम्हाला पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटनुसार त्यावर व्याज दिले जाते. EPFO: फक्त 1 दिवस शिल्लक, सोडू नका ही संधी! हायर पेन्शनसाठी अप्लाय करण्याची डेडलाइन आली जवळ तर SIP मध्ये असे नाही. काही कारणास्तव तुम्ही 5 वर्षे सतत गुंतवणूक करण्याच्या स्थितीत नसल्यास. तुम्ही ते कधीही बंद करू शकता आणि रक्कम काढू शकता. अशा वेळी, एसआयपीद्वारे तुम्ही मार्केटमध्ये जी काही रक्कम गुंतवली असेल, त्या रकमेवर मार्केटनुसार जे काही व्याज असेल, त्या व्याजासह एकूण रक्कम परत केली जाईल. दुसरीकडे, जर तुम्हाला काही काळ एसआयपी होल्ड करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता. यानंतर, तुम्ही ती कधीही पुन्हा सुरू करू शकता. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दरम्यान हप्ता भरू शकत नसाल, तर त्यासाठी कोणताही दंड नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात