मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पोस्ट ऑफिस आरडी की म्युच्युअल फंड SIP? कुठं गुंतवणूक करणं फायद्याचं?

पोस्ट ऑफिस आरडी की म्युच्युअल फंड SIP? कुठं गुंतवणूक करणं फायद्याचं?

पोस्ट ऑफिस आरडी की म्युच्युअल फंड SIP? कशात गुंतवणूक करणं फायद्याचं?

पोस्ट ऑफिस आरडी की म्युच्युअल फंड SIP? कशात गुंतवणूक करणं फायद्याचं?

दीर्घकालीन बचत आणि गुंतवणुकीचा पर्याय संपत्ती निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. जोखमीच्या क्षमतेनुसार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 नोव्हेंबर: सेवानिवृत्तीनंतरच्या कालावधीत जवळ पुरेसा पैसा असावा, तसंच मुलांचं शिक्षण, कार, घर खरेदी आणि आपत्कालीन स्थितीत पैसे उपलब्ध व्हावेत या विचाराने प्रत्येक जण बचत आणि गुंतवणुकीवर भर देत असतो. ग्राहकांची गरज ओळखून बॅंका, पोस्ट ऑफिस आणि वित्तीय संस्था सातत्याने नवनवीन बचत आणि गुंतवणूक योजना सादर करत असतात. याशिवाय म्युच्युअल फंडासारखा काहीसा जोखमीचा पर्यायदेखील उपलब्ध असतो. दुसरीकडे पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना हादेखील बचतीसाठी उत्तम पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंड एसआयपी योजना आणि पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. बचत आणि गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी या दोन्हींमधला मूलभूत फरक, त्याचे फायदे-तोटे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे.

दीर्घकालीन बचत आणि गुंतवणुकीचा पर्याय संपत्ती निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. जोखमीच्या क्षमतेनुसार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केटमधली जोखीम पत्करायची नसेल तर तुमच्यासाठी पोस्टाची रिकरिंग डिपॉझिट योजना हा उत्तम पर्याय आहे. परंतु, तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेअर बाजारातली जोखीम घेऊ शकत असाल तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपी हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना अर्थात आरडीच्या आधारे तुम्हाला निश्चित उत्पन्न मिळू शकतं. या योजनेचे व्याजदर निश्चित केलेले असतात. यात शेअर मार्केटच्या अनुषंगाने कोणतीही जोखीम नसते; पण म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये शेअर मार्केट जोखीम असते; पण त्यातून रिटर्न चांगले मिळतात. या दोन्हींमधला फरक जाणून घेऊ या.

हेही वाचा : प्रायव्हेट जॉब करताय आणि ‘हे’ नियम माहीत नाहीत? अवघडंच राव! वाचा झटप

शेअर मार्केटमधली जोखीम स्वीकारण्याची तुमची तयारी असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता. म्युच्युअल फंडाच्या एखाद्या योजनेत 1000 रुपयांची एसआयपी सुरू करू शकता. दीर्घ मुदतीत बहुतेकशा योजनांचा सरासरी परतावा वार्षिक 12 टक्के आहे. समजा तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा 1000 रुपयांची एसआयपी सुरू केली तर वर्षाला सरासरी 12 टक्के रिटर्न मिळतो. त्यानुसार तुम्हाला पाच वर्षांनंतर 82,486 रुपये मिळू शकतात. यात तुमची गुंतवणूक 60,000 रुपये असेल आणि 22,486 रुपये व्याज असेल. याचप्रमाणे तुम्ही महिन्याला 5000 रुपयांची एसआयपी सुरू केली तर पाच वर्षांत तुम्हाला 4,12,432 रुपये मिळतील. यात तीन लाख रुपये तुमची गुंतवणूक असेल आणि 1,12,432 रुपये वेल्थ गेन असेल.

दुसरीकडे, पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्ही महिना 1000 रुपयांपासून बचत सुरू करू शकता. या बचतीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडीवर 5.8 टक्के वार्षिक व्याज दिलं जात आहे. यामध्ये चक्रवाढ व्याज तिमाही आधारावर मोजलं जातं. समजा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेत दरमहा 500 रुपये बचत करत असाल तर पाच वर्षांनी मॅच्युरिटीनंतर 69,694 रुपये मिळतील. यात तुमची एकूण गुंतवणूक 60,000 रुपये असेल, तर 9694 रुपयांचं उत्पन्न तुम्हाला व्याजातून मिळेल. तसंच तुम्ही दरमहा 5000 रुपयांची बचत केली, तर पाच वर्षांत तुम्हाला 3,48,480 रुपये मिळतील. यात तुमची गुंतवणूक 3 लाख रुपये असेल आणि 48,480 वेल्थ गेन असेल.

First published:

Tags: Investment, Mutual Funds, Post office saving