Home /News /money /

Post Office मध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे

Post Office मध्ये FD करण्याचा निर्णय फायद्याचा, चांगल्या व्याजासह मिळतात हे फायदे

पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (Fixed deposit) केल्याने तुम्हाला बर्‍याच चांगल्या सुविधा मिळू शकतात. याशिवाय तुम्हाला सरकारी हमीही मिळते, जी सर्वात महत्त्वाची आहे.

    नवी दिल्ली, 17 जून : आजकाल पैसे गुंतवणुक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, सर्वांना खात्रीशीर आणि आपले पैसे सुरक्षित राहण्याची हमी हवी असते. याबाबतीत पोस्ट ऑफिसच्या (Post office) पैसे गुंतवणूक करण्याच्या योजनांवर अनेकांचा विश्वास आहे. आपणही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (Post office fixed deposite) गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी (Fixed deposit) केल्याने तुम्हाला बर्‍याच चांगल्या सुविधा मिळू शकतात. याशिवाय तुम्हाला सरकारी हमीही मिळते, जी सर्वात महत्त्वाची आहे. आपले पैसे पोस्ट ऑफिसमध्ये पूर्णपणे सुरक्षित राहतात. याशिवाय चांगला व्याजाचा लाभही मिळत असतो. येथे तुम्हाला तिमाही आधारावर व्याजाची सुविधा मिळेल. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करणे खूप सोपे काम आहे. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार आपण पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3, 5 वर्षांची एफडी करू शकतो. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केल्याचे अनेक चांगले फायदे आहेत. 1. पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेव ठेवल्यानंतर त्याची भारत सरकारकडून हमी दिली जाते. 2. ही एक सरकारी योजना आहे आणि यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. 3. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही एफडी ऑफलाइन (रोख, चेक) किंवा ऑनलाईन (नेट बँकिंग / मोबाइल बँकिंग) करू शकता. 4. आपण पोस्ट ऑफिसमध्ये एकापेक्षा जास्त एफडी बनवू शकता. याशिवाय एफडी खाते संयुक्तरित्याही ठेवू शकतो. 5 . जर आपण पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांसाठी मुदत ठेव ठेवली असेल तर आयटीआर भरताना तुम्हाला करात सूट मिळते. 6. तुमची एफडी एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे वर्ग केली जाऊ शकते. हे वाचा - दरमहा केवळ 240 रुपये देऊन मिळवा 1 कोटींचा हेल्थ इन्शुरन्स, कॅशलेस क्लेम 20 मिनिटात होईल अप्रूव्ह एफडी कशी उघडावी पोस्ट ऑफिसमधील एफडीसाठी तुम्ही चेक किंवा रोख रक्कम देऊन खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपयांची आवश्यकता आहे. या खात्यात जास्तीत-जास्त किती रक्कम ठेवावी याबाबत कोणतीही मर्यादा नाही. एफडीवर आपल्याला किती व्याज मिळते एफडीवर मिळणाऱ्या व्याजाविषयी बोलायचे झाल्यास  7 दिवस ते एक वर्षाच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज मिळते. 1 वर्ष 1 दिवसापासून 2 वर्षांच्या एफडीवर देखील समान व्याज दर आहे. एफडीवर 3 वर्षापर्यंत 5.50 टक्के दरानेच व्याज उपलब्ध आहे. 3 वर्ष 1 दिवसापासून 5 वर्षांपर्यंत एफडीवर 6.70 टक्के व्याज दिले जाते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Post office, Post office money, Post office saving

    पुढील बातम्या