नवी दिल्ली, 18 जून : डिजिटलायझेशनने सर्वसामान्यांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे. हा एक पॉझिटिव्ह बदल आहे. पेमेंट करण्याची पद्धतही खूप बदलली आहे. आता पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी बँकांमध्ये जाऊन रांगा लावण्याची गरज संपली आहे. त्याचप्रमाणे UPI ऑनलाइन पेमेंटनेही पूर्ण गेम बदललाय. आता पंजाब नॅशनल बँकेने IVR-आधारित UPI सेवा UPI 123PAY ची सुरुवात केली आहे.
UPI 123PAY सादर करणारी PNB ही पब्लिक सेक्टरमधील पहिली बँक बनली आहे. ही बँक जी कॅशलेस आणि कार्डलेस होण्यासाठी डिजिटल पेमेंट वाढवण्याच्या दिशेने काम करतेय. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करु शकता. पंजाब नॅशनल बँकेसोबतच, IDFC फर्स्ट बँक, सिटी युनियन बँक आणि NSDL पेमेंट बँक IVR द्वारे UPI पेमेंट सेवा देत आहे. UPI : क्रेडिट कार्डच्या माध्यमातून Google Pay वर UPI पेमेंट करता येते? पाहा सोपी प्रोसेस 2022 मध्ये, RBI ने UPIचं नवीन व्हर्जन UPI 123Pay सादर केलं होतं गेल्या वर्षी RBI ने UPI चं नवीन व्हर्जन UPI 123Pay सादर केलं होतं. UPI 123Pay सह, ज्या यूझर्सकडे इंटरनेटसह स्मार्टफोन नाही ते देखील UPI ट्रांझेक्शन करू शकतील. आरबीआयनुसार फीचर फोन यूझर्स 4 पर्यायांच्या सहाय्यतेने ट्रांझेक्शन करु शकतील. 1. इंटरेक्टिव्ह व्हाइस रिस्पॉन्स (Interactive Voice Response- IVR) 2. अॅप बेस्ड पेमेंट (App-Based Functionality) 3. मिस्ड कॉल (Missed call) 4. प्रॉक्सिमिटी साउंड बेस्ड पेमेंट (Proximity Sound-Based Payments) SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी, बँकेच्या या निर्णयामुळे तुमचा खिसा होणार रिकामा UPI 123PAY चा वापर कसा करायचा? » बँकेच्या IVR नंबर 9188-123-123 वर कॉल करा. » आता बेनिफिशियरी निवडा. » ट्रंझेक्शनला ऑथेंटिकेट करा.