मराठी बातम्या /बातम्या /मनी /

‘या’ बँकेत खातं असेल तर त्वरित करा ‘हे’ काम, नाहीतर काढता येणार नाहीत खात्यातील पैसे

‘या’ बँकेत खातं असेल तर त्वरित करा ‘हे’ काम, नाहीतर काढता येणार नाहीत खात्यातील पैसे

‘या’ बँकेत तुमचं खातं आहे का? मग त्वरित करा हे काम, अन्यथा काढता येणार नाहीत खात्यावरील पैसे

‘या’ बँकेत तुमचं खातं आहे का? मग त्वरित करा हे काम, अन्यथा काढता येणार नाहीत खात्यावरील पैसे

Punjab National Bank Guidelines : पंजाब नॅशनल बँकेच्या ज्या ग्राहकांनी अद्याप त्यांची केवायसी (नो युवर कस्टमर) अपडेट केलेली नाही, त्यांना पुढील महिन्यापासून अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 26 नोव्हेंबर: तुमचं खातं पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) असल्यास, ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप त्यांचे केवायसी (नो युवर कस्टमर) अपडेट केलेलं नाही, त्यांना पुढील महिन्यापासून अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकते. ज्या ग्राहकांची KYC 12 डिसेंबरनंतर प्रलंबित राहील, त्यांना त्यांच्या खात्यातून व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणूनच सर्व ग्राहकांनी 12 डिसेंबरपर्यंत केवायसी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बँकेनं म्हटलं आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, ग्राहकांनी त्यांची KYC 12 डिसेंबर 2022 पर्यंत अपडेट केली पाहिजे.

PNB ने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, ज्या ग्राहकांचे KYC अपडेट प्रलंबित आहे, त्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर दोन नोटिस आणि त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे सूचित केलं गेलं आहे. 20 आणि 21 नोव्हेंबर 2022 रोजी, बँकेनं त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर देखील या संदर्भात अधिसूचना जारी केली होती.

पंजाब नॅशनल बँकेनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व ग्राहकांसाठी केवायसी अपडेट करणं अनिवार्य आहे. जर तुमचं खातं 30.09.2022 पर्यंत KYC अपडेट नसेल, तर तुम्हाला त्याबद्दल आधीच माहिती देण्यात आली आहे. 12.12.2022 पूर्वी तुमची केवायसी अपडेट करण्यासाठी तुमच्या बँकेच्या शाखेला भेट द्या. केवायसी अपडेट न केल्यामुळं तुमच्या खात्यातील व्यवहार थांबवले जाऊ शकतात.

हेही वाचा: SEBIकडून म्युच्युअल फंड्स नियमांमध्ये मोठे बदल, गुंतवणूकदारांवर होणार परिणाम

आरबीआयनं दिला हा सल्ला-

देशातील ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना नियमितपणे KYC अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्वी बँका ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा केवायसी अपडेट करण्यास सांगत होत्या, परंतु आता अनेक बँका तीन वर्षांच्या अंतरानंतरही ते अपडेट करण्याचा सल्ला देत आहेत.

केवायसीसाठी ही कागदपत्रे द्यावी लागतील-

केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना पत्ता पुरावा, फोटो, पॅन, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागेल. आपण ई-मेल पाठवून देखील हे कार्य पूर्ण करू शकता. तसेच तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. कोणत्याही ग्राहकाला केवायसी अपडेटसाठी कॉल केला जात नसल्याचं बँकेनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणूकीपासून सावध राहा. कोणत्याही ग्राहकाला केवायसी संबंधित समस्या असल्यास ते थेट बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा तुम्ही बँकेत जाऊन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकता.

First published:

Tags: Personal banking, Punjab national bank