मुंबई, 6 डिसेंबर : आपल्या आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट खूप खास असते. पहिला मोबाईल, पहिली पर्स आणि पहिली सायकल किंवा पहिलं प्रेम… एखादी गोष्ट आपल्याला पहिल्यांदाच मिळाली असेल, तर त्याचं अप्रूप वाटणं साहजिकच आहे. या साऱ्या गोष्टींएवढीच एक गोष्ट आपण कधीच विसरू शकत नाही, ती म्हणजे तुम्ही तुम्ही मिळवलेली पहिली नोकरी आणि त्यातून मिळालेला पहिला पगार…आपण स्वतः काम करून मिळवलेला पहिला पगार खूप खास आहे. पण तुम्ही हा खास पगार आणखी खास बनवू शकता, जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. यासाठी तुम्हाला एक नियोजन करावं लागेल. तुमचा पगार खात्यात येताच तो लागू करावा लागेल. मग तुम्ही तुमचा पहिला पगार कधीच विसरू शकणार नाही. पहिला पगार झाल्यावर करा हे काम- पहिला पगार तुमच्या खात्यात जमा होताच तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. त्या पगाराचे दोन भाग करा. पहिला भाग खर्चासाठी ठेवा आणि दुसरा बचत श्रेणीत ठेवा. पहिला पगार असल्यानं त्यातून पालकांना भेटवस्तू द्यायलाच हवी. म्हणून खर्चासाठी राखून ठेवलेल्या रक्कमेतून त्यांच्यासाठी एक सुंदर भेटवस्तू खरेदी करा. गुंतवणूक सुरू करा- तुम्ही पहिल्या पगारापासून गुंतवणूक सुरू करता. जर तुम्ही जोखीम घेऊ शकत असाल तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल, तर मुदत ठेव (FD) मध्ये पैसे जमा करा. पण गुंतवणूक सुरू करा. ही तुमची सवय बनवा आणि दर महिन्याला पगार जमा होताच गुंतवणुकीच्या भागात जमा करा. अशा प्रकारे गुंतवणुकीला सुरुवात केल्यानं तुम्हाला दीर्घकाळासाठी एक मजबूत निधी तयार करण्यात मदत होईल. हेही वाचा: भाडेकराराची मुदत संपण्यापूर्वी घर मालकाला भाडं वाढवून मागण्याचा अधिकार आहे का? आरोग्य विमा- तुमच्या पहिल्या पगारातून आरोग्य विमा घ्या. कारण एखादा गंभीर आजार तुमची सर्व बचत संपवून टाकू शकतो. आजकाल उपचार इतके महाग आहेत की तुम्ही कर्जाच्या दलदलीतही अडकू शकता. म्हणूनच तुमच्या पहिल्या पगारातून आरोग्य विमा काढून काळजी घ्या. कारण जेव्हा तुम्ही आजारी पडाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या बचतीचा काही भाग उपचारासाठी खर्च करावा लागणार नाही. सेवानिवृत्ती नियोजन- आणखी एक गोष्ट तुम्ही तुमच्या पहिल्या पगारासह केली पाहिजे आणि ती म्हणजे सेवानिवृत्तीचे नियोजन. होय, जर तुम्हाला तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असेल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहायचं नसेल, तर त्यासाठी तुम्ही सरकारी पेन्शन योजना NPS किंवा PPF निवडू शकता.
पहिला पगार होईल अविस्मरणीय- अशा प्रकारे गुंतवणूक केल्यास वृद्धापकाळात तुम्हाला पैशासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. कारण म्हातारपण सगळ्यांनाच यावं लागतं. म्हणूनच पहिल्या पगारापासूनच त्याचं नियोजन सुरू करू नये. अशाप्रकारे सेवानिवृत्तीनंतर तुमच्या बचतीची रक्कम तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला पहिला पगार नक्कीच लक्षात राहील आणि अशा प्रकारे तो संस्मरणीय राहील.