मराठी बातम्या /बातम्या /मनी /

गुडन्यूज! PMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळणार मोफत धान्य

गुडन्यूज! PMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळणार मोफत धान्य

PMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळPMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळणार मोफत धान्यणार मोफत धान्य

PMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळPMGKAYचा कालावधी तीन महिन्यांनी वाढला, 80 कोटी लोकांना मिळणार मोफत धान्यणार मोफत धान्य

PMGKAY: सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ची मुदत तीन महिने वाढवली आहे. त्यामुळं तब्बल 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत राहील.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India
 • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 28 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यामुळं सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आलं आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ची मुदत तीन महिने वाढवली आहे. त्यामुळं तब्बल 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत राहील.

दरम्यान या योजनेचा कालावधी वाढण्याचे संकेत आधीपासूनच मिळत होते. मोदी सरकार 30 सप्टेंबरनंतरही गरिबांना मोफत रेशन देण्यासाठी PMGKAY योजनेचा विस्तार करण्याचा विचार करत असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्सनी दिली होती. परंतु त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान आजच्या कॅबिनेटमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी तीन महिने वाढवण्यात आला आहे. त्यामुळं 80 कोटी लोकांना मोफत धान्य  मिळत राहणार आहे.

PMGKAY योजना काय आहे?

 • प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आली.
 • लॉकडाऊन कालावधीत लोकांचा त्रास कमी करण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मोफत उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश होता.

हेही वाचा: मोबाईलबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार, तुम्हाला कसा होणार फायदा? वाचा

 • या योजनेचा अनेक वेळा विस्तार करण्यात आला आहे. आता ती 30 सप्टेंबरपर्यंत वैध होती.
 • हा कालावधी आणखी तीन महिने वाढवला आहे.
 • सुरुवातीला 2020-21 मध्ये, PMGKAY योजना केवळ एप्रिल, मे आणि जून 2020 या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी जाहीर करण्यात आली होती (फेज-I).
 • नंतर, सरकारनं ही योजना जुलै ते नोव्हेंबर 2020 (टप्पा-II) पर्यंत वाढवली.

 • 2021-22 मध्ये सुरू असलेल्या कोविड-19 संकटामुळे केंद्राने एप्रिल 2021 ते मे आणि जून 2021 (फेज-III) आणि जुलै ते नोव्हेंबर 2021 (फेज-IV) अशी अनुक्रमे दोन आणि पाच महिन्यांसाठी वाढवली.
 • ही योजना पुन्हा डिसेंबर 2021 ते मार्च 2022 (टप्पा-V) पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर केंद्राने 26 मार्च रोजी गरिबांना 80,000 कोटी रुपये खर्चाचे 5 किलो धान्य मोफत देण्याची योजना सहा महिन्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली.

First published:

Tags: Narendra modi, Scheme