जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Suicide :‘लिव्ह इन’ पार्टनरकडून फसवणूक, तरुणीनं गळफास घेत संपवलं आयुष्य

Suicide :‘लिव्ह इन’ पार्टनरकडून फसवणूक, तरुणीनं गळफास घेत संपवलं आयुष्य

‘लिव्ह इन’ पार्टनरकडून फसवणूक, तरुणीने गळफास घेत संपवलं आयुष्य

‘लिव्ह इन’ पार्टनरकडून फसवणूक, तरुणीने गळफास घेत संपवलं आयुष्य

Girl Suicide case in UP: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या पार्टनरनं तिची फसवणूक केल्याचं कळताच तिनं नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग निवडला.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 2 ऑगस्ट : गेल्या काही वर्षांत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (Live in Relationship) मध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ‘‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे लग्न न करता मुलगा आणि मुलीनं एकत्र राहणं. काही कपल थोडा काळ लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर लग्न करतात, तर काहीजण लिव्ह इनमध्ये असतानाच त्यांचं नातं तुटतं. लिव्ह इनमध्ये राहताना नात्यात चढउतार आल्यास काही कपल जीवाचं बरंवाईट करून घेतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Ghaziabad) घडली आहे.

    लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. तिच्या पार्टनरनं तिची फसवणूक केल्याचं कळताच तिनं नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग निवडला. मृत तरुणीची चुलत बहीण फ्लॅटवर पोहोचल्यावर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शहरातील आदित्य वर्ल्ड सिटी या सिटी अपार्टमेंटमध्ये घडली. या अपार्टमेंटमध्ये मुझफ्फरनगरमध्ये राहणारी युवती आणि एक तरुण बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. “दोघेही नोएडा येथील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करत होते. दोन-तीन दिवसांपासून दोघांमध्ये भांडणं होत होतं, त्यामुळे माझी बहीण डिप्रेशनमध्ये होती. माझ्या बहिणीचा ‘लिव्ह इन’ बॉयफ्रेंड विवाहित होता. ही माहिती कळल्यापासून तरुणी डिप्रेशनमध्ये होती,” असं मृत तरुणीच्या बहिणीनं पोलिसांना सांगितलं.

    हेही वाचा:  तुम्ही घरात किती कॅश अन् सोनं ठेवू शकता? कधी पडू शकतो आयकर विभागाचा छापा? जाणून घ्या सविस्तर

    “रविवारी दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर लिव्ह-इन पार्टनर तिला घरी सोडून कामावर गेला. माझी बहीण फ्लॅटवर एकटीच होती. तिने मला फोन केला आणि त्यानंतर पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली,” असं म़त तरूणीच्या बहिणीनं पोलिसांना सांगितलं.

    घटनास्थळी पोहोचलेल्या बहिणीनं आणि पोलिसांनी मुलीला खाली उतरवलं आणि कोलंबिया रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पोलिसांनी मृत तरुणीचा मोबाईल फोन आणि इतर वस्तू ताब्यात घेतल्या असून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरचा शोध सुरू केला आहे.

    हल्ली अनेक कपल एकमेकांवर विश्वास ठेवून लिव्ह-इन रिलेशनशिपचा पर्याय निवडतात आणि सोबत राहतात. पण दोघांमध्ये मतभेद झाले किंवा दोघांपैकी एखाद्यानेही जर दुसऱ्याची फसवणूक केली तर त्याचे वाईट परिणाम होतात आणि त्यातून एखाद्या पार्टनरचा जीवही जाऊ शकतो, हे गाझियाबादमधील घटनेतून दिसून आलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात