मुंबई, 4 सप्टेंबर : स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल पैसा महत्त्वाचा आहे. व्यवसाय सुरु करायचा म्हणजे जास्त पैशाची आवश्यकता असते. त्यामुळे कर्जाशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून काही प्रमाणात मदत मिळू शकते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत काही व्यवसाय सुरू करण्यासाठी सहज कर्ज दिले जात आहे. मुद्रा योजनेच्या प्रकल्प अहवालानुसार, व्यवसायाच्या एकूण खर्चाच्या 80 टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे, तेही सुलभ हप्त्यांमध्ये हे कर्ज मिळते. यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
केंद्रातील मोदी सरकारने ही योजना लागू करून 8 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मुद्रा योजना 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. मे 2014 ते मे 2022 पर्यंत म्हणजेच 8 वर्षात या योजनेंतर्गत 35 कोटी कर्जे वितरित करण्यात आली, ज्यांची एकूण किंमत 8 लाख कोटी होती. या 35 कोटी कर्ज घेणाऱ्यांपैकी 23 कोटी महिला आहेत. https://www.mudra.org.in/ या वेबसाइटवर याबद्दल तुम्हाला बरीच माहिती मिळेल.
TATA ग्रुप 18 वर्षांनंतर IPO आणण्याच्या तयारीत; 'ही' कंपनी शेअर बाजारात होणार लिस्ट?
या योजनेत व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला खर्चाच्या 25 टक्के रक्कम स्वतःहून गुंतवावी लागेल. समजा व्यवसायात तुमचा एकूण खर्च 16 लाख रुपये येत असेल तर तुम्हाला यामध्ये 4 लाख रुपये गुंतवावे लागतील. उर्वरित खर्च सरकार मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज स्वरूपात देईल. यामध्ये मुदत भांडवली कर्ज आणि कार्यरत भांडवल कर्जाचा समावेश आहे. यामध्ये मुदत कर्ज 7.50 लाख रुपये असेल, तर खेळते भांडवल कर्ज 4.16 लाख रुपये असेल. ज्यामध्ये मशिन बसवणे, कच्चा माल, पगार, वाहतूक, वीज बिल, कर यांचा समावेश आहे.
तुमचे पैसे सोप्या पद्धतीने मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बिझनेस पार्कमध्ये गुंतवा; अन् नियमित भाडं मिळवा
मुद्रा लोन कसं मिळेल?
तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये नाव, पत्ता, व्यवसाय पत्ता, शिक्षण, सध्याचे उत्पन्न आणि किती कर्ज आवश्यक आहे इत्यादी तपशील द्यावा लागेल. यामध्ये कोणतीही प्रक्रिया शुल्क किंवा हमी शुल्क भरावे लागणार नाही, तसेच कर्जाची रक्कम तुम्हाला 5 वर्षांत परत करावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.