जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PM Kisan : गुडन्यूज! 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 14 वा हप्ता

PM Kisan : गुडन्यूज! 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 14 वा हप्ता

पीएम किसान योजना

पीएम किसान योजना

तुम्ही अजूनही ई केवायसी केलं नसेल तर लगेच करून घ्या नाहीतर खात्यावर हप्ता येणार नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून पीएम किसान योजनेकडे पाहिलं जातं. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठवले जातात. आतापर्यंत या योजनेचे १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याची प्रतिक्ष आहे. 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये पैसे मिळतात. नवीन आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता सरकार लवकरच जारी करणार आहे. साधारणपणे, आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा ऑगस्ट आणि नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो. जर एखाद्या शेतकऱ्याचे खाते DBT किंवा NPCI शी लिंक केलेले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांचा अडचणी दूर करण्यासाठी पोस्टाकडून खास मोहीम, लगेच घ्या फायदा Video

जूनमध्ये येऊ शकतो हप्ता सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यात येणार होता. आता एप्रिल आणि मे दोन महिने सरले आहेत. चौदावा हप्ता जून आणि जुलै महिन्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. ज्यांनी ई केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना तेरावा आणि चौदावा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही ई केवायसी केलं नसेल तर लगेच करून घ्या नाहीतर खात्यावर हप्ता येणार नाही. पीएम किसान पोर्टलवर क्लिक करा तिथे फार्मर कॉर्नरवर बेनिफिशियरी लिस्टवर क्लिक करा राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक गाव हे सर्व पर्याय निवडा रिपोर्ट मिळवा आणि टॅबवर क्लिक करा तिथे तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही ते पाहू शकता.

PM Kisan Yojana: तुमचं नाव लिस्टमध्ये आहे की नाही कसं तपासायचं?
News18लोकमत
News18लोकमत

KYC कसं करायचं अपडेट पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या उजव्या बाजूला केवायसी ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चर कोड अपलोड करा, तुम्ही सर्चवर क्लिक करा आधार कार्डशी जोडलेला नंबर इथे अपलोड करा ओटीपीसाठी येईल त्यानंतर अपलोड करा आणि जमा करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात