मुंबई, 11 डिसेंबर: भारत सरकार देशातील शेतकऱ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचं काम सरकार करत आहे. या संदर्भात, 2018 मध्ये, भारत सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली. या योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे.
दरवर्षी मिळणारी 6 हजार रुपयांची ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. आतापर्यंत एकूण 12 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. 12वा हप्ता मिळाल्यानंतर अनेक शेतकरी 13व्या हप्त्याच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात, भारत सरकार लवकरच 13व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करू शकते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13वा हप्ता कधी जमा होईल?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत सरकार 13व्या हप्त्याचे पैसे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा: चांदीच की! FD वर तब्बल 9 टक्के व्याज दर, ‘या’ बँकेची विशेष योजना
त्वरित करा ईकेवायसी, नाहीतर अडकतील पैसे-
दुसरीकडे जर तुम्ही आतापर्यंत योजनेमध्ये तुमची ई-केवायसी केली नसेल. अशा परिस्थितीत, तुम्ही लवकरात लवकर योजनेमध्ये तुमचे ई-केवायसी करा. जर तुम्ही तुमचे ई-केवायसी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केले नाही. अशा परिस्थितीत तुमचे 13 व्या हप्त्याचे पैसे अडकू शकतात.
चुकीची माहिती करा दुरुस्त, नाहीतर जमा होणार नाहीत हप्त्याचे पैसे-
याशिवाय योजनेत नोंदणी करताना चुकीची माहिती टाकली असेल तर या स्थितीतही तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. अशा परिस्थितीत, योजनेत तुमचा चुकीचा तपशील लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावा.
रेशनकार्डची प्रत अपलोड केली का?
दुसरीकडे, जर तुम्ही अद्याप तुमच्या रेशन कार्डची प्रत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत जमा केली नसेल, तर या स्थितीतही तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही रेशन कार्डची प्रत लवकरात लवकर योजनेत जमा करावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.