नवी दिल्ली, 2 मे: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लहान व सर्वसाधारण शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. योजनेंतर्गत दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये (DBT) थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत एकूण 7 हप्त्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत आता 8 वा हप्ताही लवकरच खात्यात जमा होणार आहे. यासाठीची सर्व माहिती pmkisan.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. यादीमध्ये असं तपासा आपलं नाव आपण देखील शेतकरी असल्यास आणि या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास आपल्याला प्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर आपल्या गावात कोणा-कोणाला 2000 रुपये मिळत आहेत हे, जाणून घ्यायचे असेल तर त्याची यादी पाहणे खूप सोपे आहे. अगदी घरबसल्या संपूर्ण गावातील लाभार्थ्यांची यादी आपण पाहू शकतो. सर्व प्रथम, आपल्याला पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइट https://pmksan.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर, मुख्य पृष्ठावर (होम पेज) जाऊन फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तेथे तुमच्या आठव्या हप्त्याच्या स्टेटसवर Waiting for approval by state असे लिहिेले असेल तर तुम्हाला काही काळ वाट पहावी लागले, कारण त्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळताच तुमच्या खात्यावर 2000 हजार रुपये जमा होतील. हे वाचा - Assembly Election Result: ममता आणि मोदींपेक्षाही यांचीच जास्त चर्चा, बंगालमध्ये फासा पलटवण्यासाठी उतरलेले कोण आहेत शुवेंदू अधिकारी? जर स्टेटसमध्ये Rft Signed by State Government असे लिहिलेले असेल तर याचा अर्थ असा असेल की, संबंधित लाभार्थ्यांचा डेटा तपासला गेला आहे, त्यानंतर राज्य सरकार केंद्राला लाभार्थ्याच्या खात्यात पैसे पाठविण्याची विनंती करेल. आणि जर स्टेटसमध्ये FTO is Generated and Payment confirmation is pending असे लिहले असेल तर तुमचा आठवा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, असे समजावे. हे वाचा - ‘इंदिरानगर का गुंडा’ द्रविडनंतर श्रीनाथ -प्रसादचा कधीही न पाहिलेला अवतार आला समोर, पाहा VIDEO याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांना काही अडचणी असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा - पीएम किसान हेल्पलाईन - 155261 पंतप्रधान किसान टोल फ्री - 1800115526 पंतप्रधान किसान लँडलाइन क्रमांक: 011-23381092, 23382401 याशिवाय pmkisan-ict@gov.in या मेल आयडीवरही ईमेल करून माहिती मागवता येते किंवा तक्रार नोंदवता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.