जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PM Kisan : 13 वा हप्ता कधी येणार, तुम्हाला लाभ मिळणार की नाही लगेच चेक करा

PM Kisan : 13 वा हप्ता कधी येणार, तुम्हाला लाभ मिळणार की नाही लगेच चेक करा

pm kisan

pm kisan

पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : पीएम किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेचा 12 वा हप्ता देखील खूप उशिरा आहे. 13 वा हप्ता मिळेल याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. अजूनही त्याबाबत त्यांनी माहिती न मिळाल्याने काहीशी नाराजी देखील आहे. पण पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसारप पुढच्या आठवड्यात हा हप्ता येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, असे केंद्र सरकारचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकार ठरलेल्या वेळेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचेल. हप्ते देण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. हा हप्ता या आठवड्यात किंवा २६ जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

50:30:20 हे फक्त आकडे नाहीत तर आहे बचतीचा मॅजिकल फॉर्म्युला; असे वाचतील लाखो रुपये

ऑनलाईन करणं गरजेचं? पीएम किसान स्कीम अंतर्गत शेतकऱ्यांना KYC करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन करताना रेशन कार्डची सॉफ्ट कॉपी जमा करणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही ते चेक करायचं आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड बँकेशी लिंक करणे बंधनकारक केलं आहे. आधार कार्ड लिंक झाल्यानंतरच बँकेची ई-केवायसी पूर्ण होईल. हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड बँकेशी जोडले जावे, असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना २३ वा हप्ता दिला जाणार आहे.

Gold Price Today : रेकॉर्ड ब्रेक! सोन्याचा आणखी एक उच्चांक, किंमत पाहूनच फुटेल घाम
News18लोकमत
News18लोकमत

अपात्रता आणि ई-केवायसी अभावी २ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर बारावा हप्ता पोहोचला नाही. आता जे पात्र शेतकरी आहेत, त्यांना केंद्र सरकार ई-केवायसी करण्याची संधी देत आहे. जर तुम्ही केलं नसेल तर आताच करून घ्या नाहीतर तुम्हाला हप्ता मिळणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , PM Kisan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात