मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खात्यावर पैसे नसतील तरीही मिळणार 10 हजारांचा फायदा? नक्की काय सरकारची योजना

खात्यावर पैसे नसतील तरीही मिळणार 10 हजारांचा फायदा? नक्की काय सरकारची योजना

केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी आर्थिक योजना आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बचत खातं, चेकबुक, ATM, लोन, विमा अशा अनेक सुविधा दिल्या जातात.

केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी आर्थिक योजना आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बचत खातं, चेकबुक, ATM, लोन, विमा अशा अनेक सुविधा दिल्या जातात.

केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी आर्थिक योजना आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बचत खातं, चेकबुक, ATM, लोन, विमा अशा अनेक सुविधा दिल्या जातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई: तुमच्या खात्यावर अगदी शून्य रुपये असतील तर तुम्हाला 10 हजार रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल पण खरंच स्कीमचा फायदा कोण घेऊ शकणार आहे, त्यासाठी काय करावं लागेल याबाबत माहिती जाणून घेऊया.

ज्या नागरिकांचं प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे बँकेत खातं आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या खात्याचे अनेक फायदे आहेत. फायद्यांविषयी तुम्हाला माहिती असायलाच हवी. जनधन योजनेत खात्यात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. अपघात विमा, ओव्हरड्राफ्टची सुविधा, चेकबुक अशा वेगवेगळ्या सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येतो.

जनधन खातं असलेल्या नागरिकांना 10 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा घेता येतो. ही सुविधा कमी कालावधीसाठी मिळणाऱ्या लोनसारखी आहे. सुरुवातीला ही रक्कम केवळ 5 हजार रुपये होती. आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. तुम्ही 10 हजार रुपयांसाठी ओव्हरड्राफ्टची रिक्वेस्ट टाकू शकता.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या ‘या’ 5 गोष्टी; नाहीतर...

केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी आर्थिक योजना आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बचत खातं, चेकबुक, ATM, लोन, विमा अशा अनेक सुविधा दिल्या जातात. हे खाते तुम्ही कोणत्याही बँक शाखेतून किंवा बँक मित्रा आउटलेटमधून उघडू शकता. पीएमजेडीवाय खाती झीरो बॅलन्ससह उघडता येतं.

ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा घेण्यासाठी जनधन खातं हे 6 महिने जुनं असायला हवं. तरच ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळू शकते. यासाठी 65 वर्षांपेक्षा जास्त वय असायला हवं. जर तुमचं वय कमी असेल तर फक्त 2 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते.

खुशखबर! या बँका FD वर 7% पेक्षा देतायत जास्त व्याज, तुमची बँक आहे का?

एस सुरु करा अकाउंट

पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत बँकांमध्ये खाते उघडायचे असेल तर. कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही जनधन खाते उघडू शकता. जर तुमचं इतर कोणतंही बचत खातं असेल तर तुम्ही त्याचं रूपांतर जनधन खात्यातही करू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय 10 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, तो या योजनेअंतर्गत जनधन खाते उघडू शकतो.

First published:

Tags: Bank details, Bank statement, Money, PM Kisan