जाहिरात
मराठी बातम्या / मनी / म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या ‘या’ 5 गोष्टी; नाहीतर...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या ‘या’ 5 गोष्टी; नाहीतर...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या ‘या’ 5 गोष्टी; नाहीतर...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या ‘या’ 5 गोष्टी; नाहीतर...

Mutual Fund Investment Tips: शेअर मार्केटमध्ये कंपन्यांच्या हजारो म्युच्युअल फंड योजना असल्याने हे काम आणखी कठीण झाले आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 नोव्हेंबर: म्युच्युअल फंड जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोरोनाच्या कालावधीनंतर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची लोकांचा कल वाढत आहे. साधारणपणे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. शेअर बाजाराव्यतिरिक्त म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सोने आणि वस्तूंमध्येही पैसे गुंतवले जाऊ शकतात. जर तुम्हाला चांगला नफा कमवायचा असेल तर सर्वात मोठा प्रश्न आहे योग्य म्युच्युअल फंड निवडण्याचा. शेअर बाजारात कंपन्यांच्या हजारो म्युच्युअल फंड स्कीम्स असल्यानं हे काम आणखी कठीण झालं आहे, त्यामुळं गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक झालं आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल तर गुंतवणुकीबाबत स्पष्टता असली पाहिजे. प्रथम तुम्हाला हे ठरवावं लागेल की गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आहे, किती काळासाठी आणि किती गुंतवणूक करायची आहे. या प्रश्नांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. विशेषत: तुम्हाला किती काळ गुंतवणूक करायची आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण म्युच्युअल फंड वेगवेगळ्या कालावधीच्या गुंतवणुकीसाठी वेगवेगळे असतात. अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी डेट फंड किंवा लिक्विड फंड निवडू शकतात. जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असाल, तर इक्विटी म्युच्युअल फंड इतरांपेक्षा सर्वोत्तम असतील. धोका- म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी, गुंतवणूक करताना तुम्ही किती जोखीम पत्करू शकता याचे आकलन करणे आवश्यक आहे. कारण जास्त परताव्यासाठी तुम्हाला अधिक जोखीम पत्करावी लागू शकते. गुंतवणुकीत केवळ परतावाच नाही तर तुमचे भांडवलही सुरक्षित असले पाहिजे. म्हणून, तुम्हाला असा फंड निवडावा लागेल, ज्यामध्ये परतावा आणि जोखीम यांच्यात समतोल असेल. अन्यथा, तुमचे खूप नुकसान होण्याची शक्यता वाढते. फंड हाऊस आणि मॅनेजरचे रेकॉर्ड- जर तुम्ही गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाची निवड केली असेल तर ज्या कंपनीनं ही योजना आणली आहे, त्यांचा रेकॉर्ड नक्की पहा. यासोबतच कंपनीच्या व्यवस्थापकाचे रेकॉर्डही तपासणं आवश्यक आहे. विशेषत: या गोष्टींसाठी तुम्हाला फंड हाऊस किती काळ कार्यरत आहे, त्याच्या इतर योजनांची कामगिरी कशी आहे, बाजारात कंपनीची प्रतिष्ठा कशी आहे हे जाणून घेतलं पाहिजे. ही माहिती कोणत्याही म्युच्युअल फंड कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असते. अशा अनेक वेबसाइट्स आहेत, जिथे कोणत्याही फंडाची कामगिरी, रेटिंग, पोर्टफोलिओ याबद्दल माहिती उपलब्ध असते. हेही वाचा:   खुशखबर! या बँका FD वर 7% पेक्षा देतायत जास्त व्याज, तुमची बँक आहे का? फंडाची मागील कामगिरी तपासून पहा- जर एखाद्या फंडानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली असेल, तर तो यापुढेही चांगली कामगिरी करत राहील, असं नाही. योग्य फंडाची निवड करताना, वेगवेगळ्या फंडांच्या मागील कामगिरीचा अभ्यास करा, जेणेकरुन तुम्हाला कोणता फंड सुसंगत आहे याची कल्पना येईल. हे तुम्हाला तुमची पसंतीची योजना आणि म्युच्युअल फंड निवडण्यात मदत करेल. फंड निवडताना तुम्ही वेगवेगळ्या रेटिंग एजन्सींनी या फंडांना दिलेले रेटिंग देखील तपासले पाहिजे.

News18लोकमत
News18लोकमत

खर्चाची माहिती घ्या- म्युच्युअल फंडाची निवड करताना त्यात गुंतवणुकीशी निगडीत खर्चाची माहिती असायला हवी. प्रवेश आणि निर्गमन भार, मालमत्ता व्यवस्थापन शुल्क, खर्चाचे प्रमाण. मालमत्तेचे व्यवस्थापन शुल्क आणि खर्चाचे प्रमाण यांसारखे खर्च पाहणे आवश्यक आहे. या सर्व खर्चामुळे तुमचा नफा कमी होतो. म्युच्युअल फंडासाठी 1.5 टक्क्यांपर्यंत खर्चाचे प्रमाण योग्य मानलं जातं. जर एखाद्या फंडाचे खर्चाचे प्रमाण यापेक्षा जास्त असेल तर त्यात गुंतवणूक करणे टाळा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात