मुंबई, 23 फेब्रुवारी: गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन (PM Cares for children Scheme) योजनेअंतर्गत सहाय्य रकमेसह शिक्षण आणि वैद्यकीय विम्याची (medical insurance) सुविधा जाहीर केली होती. त्यानुसार, कोरोनामुळे आई-वडीलांचं छत्र गमावलेल्या मुलांना वयाच्या 18 वर्षांपर्यंत मासिक स्टायपेंड मिळेल, असं त्यांनी सांगितलं होतं. तसेच वयाच्या 23 व्या वर्षी या योजनेतील पात्र मुलांना पीएम केअर फंडातून एकाचवेळी 10 लाख रुपये दिले जातील, या मुलांना केंद्र सरकार मोफत शिक्षण देईल, त्यांना उच्च शिक्षणासाठी कर्ज मिळेल आणि त्याचं व्याज पीएम केअर फंडातून दिलं जाईल, असंही ते म्हणाले होते. भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेच्या नोंदणीची तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2021 होती. या संदर्भात मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना, महिला आणि बाल विकास, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागांना पत्र लिहिले असून, त्याची एक प्रत सर्व जिल्हा दंडाधिकारी/जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. सर्व पात्र मुलांची आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेच्या लाभासाठी नोंदणी केली जाऊ शकते. आता या योजनेतील पात्रतेचे निकष काय आहेत, हे आणि योजनेसंदर्भातील इतर प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात. हे वाचा- …म्हणून मेट्रो शहरांत Petrol Diesel दर स्थिर आहेत? तपासा आजचा लेटेस्ट भाव ज्या मुलांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) कोरोनाला जागतिक महामारी (Corona pandemic) घोषित केल्याच्या 11 मार्च 2020 या तारखेपासून ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपले दोन्ही पालक किंवा एकमेव पालक गमावले आहेत, ते या योजनेसाठी पात्र ठरतील. यामध्ये कायदेशीर पालक / दत्तक पालक / एकल दत्तक पालक यांचाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी, पालकांच्या मृत्यूच्या तारखेला मुलाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असावे. योजना राबवण्याचं कारण या योजनेचा उद्देश आरोग्य विम्याद्वारे मुलांची काळजी घेणं, त्यांना शिक्षणाद्वारे सशक्त आणि सक्षण बनवणं हा आहे. तसंच कोरोना महामारीच्या काळात ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत, अशा मुलांना वयाच्या 23 व्या वर्षी 10 लाखांचे आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबी करण्यासाठी सरकारने मदतीची ही घोषणा केली आहे. हे वाचा- पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला स्विगी आयपीओ आणणार? 6000 कोटी उभारण्याची योजना मदतीचं स्वरुप पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना इतर गोष्टींबरोबरच, या मुलांना सर्वांगीण दृष्टिकोन, शिक्षण, आरोग्यासाठी निधी, वयाच्या 18 व्या वर्षापासून मासिक स्टायपेंड आणि 23 वर्षांचे झाल्यावर 10 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मदत म्हणून देते. योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी कुठे करायची ही योजना https://pmcaresforchildren.in या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहे. सर्व राज्यं/केंद्रशासित प्रदेशांना आता या पोर्टलवर 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पात्र मुलांची ओळख करून त्यांची नोंदणी करण्यास सांगितलं गेलं आहे. या पोर्टलद्वारे कोणताही नागरिक या योजनेअंतर्गत पात्र बालकाची माहिती प्रशासनाला देऊ शकतो. तर, तुमच्या ओळखीत किंवा परिसरात अशी पात्र मुलं असतील, तर तुम्ही त्यांना या योजनेबद्दल माहिती देऊ शकता. अथवा या पोर्टलवर सरकारला तुम्ही त्या मुलांची माहिती देऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.