मराठी बातम्या /बातम्या /मनी /

मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय? कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय? कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय? कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवायचंय? कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचं कारण म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणं पूर्वीच्या तुलनेत सोपं झालंय. पण ते पूर्वीपेक्षा महाग झालंय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 नोव्हेंबर: परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचं कारण म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणं पूर्वीच्या तुलनेत सोपं झालंय. पण ते पूर्वीपेक्षा महाग झालंय. विद्यार्थ्यांमधील वाढत्या शैक्षणिक स्पर्धेमुळे स्टुडंट लोन मिळणंही कठीण होत आहे. पण, एनबीएफसी 84.8 टक्के स्टुडंट लोन स्वीकारतात. अशा परिस्थितीत एज्युकेशन लोन रिजेक्ट होण्याची अनेक कारणं असू शकतात.

तुमचं शैक्षणिक ट्रॅक रेकॉर्डदेखील तुमच्या मुलाचं लोन अॅप्लिकेशन रिजेक्ट होण्यास कारणीभूत एक घटक बनतो. विद्यार्थ्याच्या रेकॉर्डमध्ये शैक्षणिक गॅप असेल, एक सेमिस्टर निलंबन किंवा इंटर्नल एक्जाम दिल्या नसतील, तरीही लोन मिळत नाही. कारण कॉलेजमधून पास झाल्यानंतर विद्यार्थी कर्जाची परतफेड कशी करू शकेल, याकडे बँका लक्ष देतात. त्यामुळे शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी विद्यार्थ्याचं चांगलं शैक्षणिक रेकॉर्ड ही एक सकारात्मक बाब आहे.

लोन अर्ज अप्रूव्ह होण्यास मदत करणारे घटक

चांगल्या कॉलेज व युनिव्हर्सिटीची निवड

तुम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता, त्या कॉलेजचा तुमच्या लोन मिळण्याच्या शक्यतांवर मोठा प्रभाव पडतो. बँकेच्या दृष्टिकोनातून, हार्वर्डमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचा कर्जासाठीचा अर्ज हा राज्यातील एखाद्या युनिव्हर्सिटीसाठी विद्यार्थ्याने केलेल्या अर्जापेक्षा चांगला मानला जातो. या मोठ्या इन्स्टिट्युट व्यतिरिक्त, बँकादेखील वार्षिक QS लिस्टप्रमाणे युनिव्हर्सिटी रँकिंग तपासतात. त्याचप्रमाणे, तिथून एसटीईएम कोर्समधून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कर्जाची परतफेड करण्याची क्षमता जास्त असल्याने प्राधान्य दिलं जातं. बँका अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी आणि सर्टिफिकेट कोर्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुतांशवेळा सहज कर्ज देतात.

हेही वाचा: विवाहित जोडप्यांसाठी बेस्ट प्लॅन! प्रतिमहा गुंतवा फक्त 200 रुपये अन् दरवर्षी मिळवा 72,000 रुपये

क्रेडिट स्कोअर चांगला असणं

इतर कोणत्याही प्रकारच्या लोन किंवा क्रेडिट अर्जाप्रमाणे या लोनसाठीदेखील बँक किंवा एनबीएफसी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासते. 600 किंवा त्यापेक्षा कमी CIBIL स्कोअरचा तुमच्या लोनच्या अर्जावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी लोनसाठी दुसऱ्या व्यक्तीची सही घेऊन याची लिमिट वाढवता येते.

कोणत्या देशात घ्यायचंय शिक्षण

तुम्ही ज्या देशात शिक्षण घेण्याचा विचार करत आहात, त्या देशाचा तुमच्या कर्ज अर्जाच्या अटींवर परिणाम होतो. जर तुम्हाला अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया या हाय स्टडी लेव्हल असलेल्या देशांमध्ये शिकण्यासाठी लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला मेक्सिको, जपान किंवा चीनसारख्या देशांच्या तुलनेत लोन सहज मिळू शकतं. कारण स्थिर आणि योग्यरित्या डेव्हलप पाश्चिमात्य देश चांगला रोजगार आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारे मानले जातात.

डॉक्युमेंट नीट मॅनेज करा

स्टुडंट लोनसाठी विद्यार्थी, पालक, शाळा, कॉलेजेस आणि इतर इन्स्टिट्युटकडून आवश्यक त्या सर्व प्रकारच्या कागदपत्रांची व्यवस्था करावी लागते. आयडीपासून क्रेडिट हिस्ट्रीपर्यंत सर्वकाही व्यवस्थित ठेवणं कधीकधी कठीण होतं. त्यामुळे अनेकवेळा कागदपत्रं हरवतात. म्हणूनच सर्व कागदपत्रं एकाचठिकाणी व्यवस्थित व सुरक्षित ठेवावीत, जेणेकरून लोनच्या अर्जाची प्रक्रिया सुलभ करता येईल.

First published:

Tags: Education, Loan