मुंबई, 20 ऑगस्ट : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवहाराशी संबंधित एक मेसेज व्हायरल होत आहे. तुमचेही SBI मध्ये बचत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. व्हायरल मेसेजमध्ये दावा केला जात आहे की बचत खात्यात तुम्ही वर्षाला 40 व्यवहार करू शकता. 40 पेक्षा जास्त व्यवहारांसाठी, प्रत्येक व्यवहारावर खात्यातील शिल्लकमधून 57.5 रुपये कापले जातील आणि एटीएममधून 4 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास एकूण 173 रुपये कापले जातील. पीआयबीने त्यांच्या फक्ट चेकमध्ये हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने आपल्या फॅक्ट चेक अकाउंटवरून ट्विट केले की बँकेने असा कोणताही नियम केलेला नाही. ते म्हणाले की, हे सर्व दावे खोटे आहेत. बँकेने व्यवहार करण्यासाठी कोणतेही नियम बदललेले नाहीत. UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करणं होणार महाग; डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शनसाठीही लागणार शुल्क दर महिन्याला 5 मोफत व्यवहार करता येतील अलीकडेच, PIB Fact द्वारे सांगण्यात आले की तुम्ही तुमच्या बँकेच्या ATM मधून दर महिन्याला 5 मोफत व्यवहार करू शकता. यानंतर व्यवहारासाठी किंवा कोणत्याही करासाठी जास्तीत जास्त 21 रुपये स्वतंत्रपणे द्यावे लागतील.
दावा: बचत खाते मे वर्ष मे 40 ट्रांजेक्शन से अधिक होने पर जमा राशि से प्रति ट्रांजेक्शन ₹57.5 की कटौती की जाएगी और एटीएम से 4 बार से अधिक पैसा निकालने पर कुल ₹173 काटे जायेंगे#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 18, 2022
▶️ये दावे #फर्जी हैं
▶️@TheOfficialSBI ने ट्रांजेक्शन के नियमों में बदलाव नहीं किया है https://t.co/s3b8VwEhv5 pic.twitter.com/JGSaFavzJv
आणखी एक बनावट मेसेज व्हायरल पीआयबी फॅक्ट चेकने आणखी एका व्हायरल मेसेजला बनावट असल्याचे म्हटले होते. या व्हायरल मेसेजमध्ये केंद्रातील मोदी सरकार आधार कार्डधारकांना 4.78 लाख रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा केला जात होता. फॅक्ट चेकमध्ये, पीआयबीने म्हटले आहे की हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. यात तथ्य नाही. केंद्रातील मोदी सरकार आधार कार्डधारकांना कोणत्याही प्रकारचे कर्ज देत नाही. पीआयबी फॅक्ट चेक म्हणजे काय? पीआयबी फॅक्ट चेक ही भारत सरकारची अधिकृत फॅक्ट चेक संस्था आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक वेळा चुकीच्या बातम्या व्हायरल होऊ लागतात. अशा परिस्थितीत, पीआयबी फॅक्ट चेक अशा बातम्यांची पडताळणी करते आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा प्रसार रोखते.