पीआयबीचे असे म्हणणे आहे की, जर तुमच्याकडे कोणताही व्हायरल मेसेज आला आणि त्यामध्ये कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याचे सांगण्यात आले तर तसे अजिबात करू नका. सर्वात आधी त्या मेसेजची विश्वासार्हता तपासून घ्या आणि त्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही एखाद्या बनावट मेसेज किंवा लिंकवर क्लिक केल्यास ऑनलाइन फ्रॉड होण्याची शक्यता अधिक असते. पीआयबी फॅक्ट चेक काय काम करते? PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.दावा: एक #YouTube वीडियो में यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी महिलाओं के बैंक खातों में 'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' के तहत 2 लाख 20 हज़ार रूपए की राशि जमा कर रही है।#PIBFactCheck: यह दावा फर्जी है। केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है। pic.twitter.com/LPEHGvzh2C
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 15, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.