जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कोरोनाच्या संकटकाळातही 1 ऑक्टोबरपासून देशभरात उघडणार सिनेमागृहं? वाचा काय आहे सत्य

कोरोनाच्या संकटकाळातही 1 ऑक्टोबरपासून देशभरात उघडणार सिनेमागृहं? वाचा काय आहे सत्य

कोरोनाच्या संकटकाळातही 1 ऑक्टोबरपासून देशभरात उघडणार सिनेमागृहं? वाचा काय आहे सत्य

सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट व्हायरल होते आहे की, देशभरात 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृहं उघडण्यात येणार आहेत. जाणून घ्या काय आहे त्यामागचे सत्य

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : कोरोना व्हायरस (Coronavirus) चे वाढते संक्रमण रोखण्यासाठी देशभरात 23 मार्च पासून सिनेमागृहं बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये देखील सिनेमाहॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. अशावेळी सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट व्हायरल होते आहे की, देशभरात 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृहं उघडण्यात येणार आहेत. एका मीडिया अहवालात असा दावा करण्यात आला आहे की गृह मंत्रालयाने काही कडक नियमांसह 1 ऑक्टोबरपासून सिनेमागृहं पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे सत्य? भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल असणाऱ्या पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या दाव्याबाबत तपास केला तेव्हा सत्य समोर आले आहे. त्यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने त्यांच्या ट्विटर हँडलवरून असे लिहिले आहे की, गृहमंत्रालयाने सिनेमाहॉल पुन्हा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही आहे. (हे वाचा- नव्या नियमांमुळे सहकारी बँकेत जमा असणाऱ्या तुमच्या पैशावर होणार थेट परिणाम)

जाहिरात

गृह मंत्रालयाने अनलॉक 4.0 (Unlock 4.0) मध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची परवानगी दिली होती. पण सिनेमा हॉल, स्विमिंग पूल आणि थिएटर 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. देशात कोरोनाच्या केस वाढत आहेत. रोज 90 हजारहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. हे पाहता सरकारने अद्याप सिनेमागृह उघडण्यास परवानगी दिली नाही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PIB
  • First Published :
जाहिरात
जाहिरात