मुंबई, 08 मार्च : येस बँकेवर (Yes Bank) निर्बंध लादल्यामुळे ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस (Yes) बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहे. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे सर्वात मोठा फटका बसला होता तो म्हणजे ‘फोन पे’ (PhonePe) या अॅपला. येस बँक UPI पार्टनर असल्यामुळे PhonePeला मोठा तोटा सहन करावा लागला. बँकिंगच्या सेवांसाठी फोन पे येस बँकेता वापर करत असे. येस बँक फोन पे साठी ‘पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर’ म्हणून काम पाहायची. मात्र निर्बंध लागल्यानंतर खूप वेळासाठी PhonePe अॅपवरून कोणतेच व्यवहार होत नव्हते. यासंदर्भात ‘फोन पे’ अॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर निगम यांनी यांसदर्भात संयम राखण्याचं आवाहन ग्राहकांना केलं होतं.
Dear @PhonePe_ customers. We sincerely regret the long outage. Our partner bank (Yes Bank) was placed under moratorium by RBI. Entire team's been working all night to get services back up asap. We hope to be live in a few hours. Thanks for your patience. Stay tuned for updates!
— Sameer.Nigam (@_sameernigam) March 6, 2020
ICICI च्या मदतीने सेवा पूर्ववत समीर निगम यांनी आणखी एक ट्वीट करत अॅपची सेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली. आता आयसीआयसीआय बँक फोन पेची नवीन UPI पार्टनर असणार आहे.
Dear @PhonePe_ users. We are back with a bang! Would've been impossible to do so in record time without incredible effort & inspirational leadership displayed by @NPCI_NPCI and our new UPI partner @ICICIBank!
— Sameer.Nigam (@_sameernigam) March 7, 2020
Will never forget because - A friend in need is a friend indeed 🙏🙏🙏
कमी वेळात सेवा पूर्ववत करण्यास मदत करण्यासाठी त्यांनी आयसीआयसीआय बँक आणि National Payments Corporation of India चे आभार या ट्वीटमधून मानले आहेत.