नवी दिल्ली, 11 जुलै: रिटायरमेंटनंतर (Retirement) सरकारी कर्मचाऱ्यांना एक ठराविक पेन्शन मिळतं. तसंच नोकरदार वर्गासाठी नोकरीदरम्यान ईपीएफ (EPF) खात्यात सॅलरीतील काही रक्कम जमा होते. या रकमेवर व्याज मिळतं आणि त्यानंतर हेच पैसे पेन्शन रुपात मिळतात. परंतु रिटायरमेंटनंतरही PF वर व्याज मिळू शकतं.
कधी आणि कसा मिळेल लाभ -
भारतीय भविष्य निर्वाह निधी कायद्यांतर्गत ईपीएफ खातं कर्मचाऱ्याला पेन्शनवर तोपर्यंत व्याज देतं, जोपर्यंत कर्मचाऱ्याचं वय 58 वर्षाहून कमी आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने 55 व्या वर्षी किंवा रिटायरमेंटच्या आधीच नोकरी सोडली, तर अशा स्थितीतही एका ठराविक मर्यादेपर्यंत पीएफवर व्याज मिळू शकतं.
नियमांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 55 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि 58 वर्ष पूर्ण होण्याआधी, रिटायरमेंटआधी नोकरी सोडल्यास त्या नोकरीशी संबंधीत पीएफ अकाउंटवर पुढील 3 वर्षांपर्यंत व्याज मिळतं. या 3 वर्षात तुमच्या अकाउंटमध्ये कोणतंही कॉन्ट्रिब्यूशन न गेल्यासही व्याज मिळत राहतं.
तसंच, जर तुम्ही 3 वर्ष म्हणजे 36 महिन्यांमध्ये पीएफमधून पैसे न काढल्यास, तुमचं ईपीएफ अकाउंट निष्क्रिय होतं. अशा स्थितीत ईपीएफ अकाउंटवर व्याज मिळणार नाही.
काय आहे SCWF -
निष्क्रिय अकाउंट 7 वर्षांपर्यंत इनअॅक्टिव्ह मानलं जातं. या 7 वर्षात खात्यात फंडसाठी क्लेम न केल्यास, ही रक्कम सीनियर सिटिजन्स वेलफेअर फंड अर्थात SCWF मध्ये जाते. पीएफ अकाउंटमधील क्लेम न केलेली रक्कम 25 वर्षांपर्यंत सीनियर सिटिजन्स वेलफेअर फंडात राहते. यादरम्यान तुम्ही पीएफ अकाउंट रकमेवर क्लेम करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news, PF Amount, PF Withdrawal