मुंबई, 24 जून : तुम्ही सरकारी आणि गैर-सरकारी संघटित क्षेत्रात काम करत असाल तर लवकरच चांगली बातमी मिळू शकते. देशातील 6 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यांमध्ये (PF Accounts) सरकार लवकरच आर्थिक वर्ष 2022 चे व्याज ट्रान्सफर (Interest Amount) करणार आहे. पीएफ कपात करणारी संस्था EPFO कर्मचाऱ्यांच्या खात्यात 30 जूनपर्यंत व्याजाचे पैसे ट्रान्सफर करू शकते. केंद्र सरकार (Central Government) पीएफवर 8.1 टक्के व्याज देत आहे. ईपीएफओने खात्यांमधील व्याज ट्रान्सफरबाबत काहीही सांगितलेले नाही.
EPFO ने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी 8.1% व्याजदर निश्चित केला आहे. गेल्या 10 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. यावेळी सरकार आणखी व्याज जाहीर करेल, अशी ईपीएफओ सदस्यांची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. सरकारच्या या निर्णयामुळे ईपीएफओच्या सुमारे 6 कोटी ग्राहकांना धक्का बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळत होते.
PPF खात्यातून मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढता येतात, किती होईल नुकसान? चेक करा प्रोसेस
व्याजदरात सतत कपात
EPFO ने 2019-2020 या आर्थिक वर्षात 8.5% व्याज दिले होते. 2020-2021 मध्ये 8.5% दराने व्याज देखील मिळाले, तर आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65%, 2017-18 मध्ये 8.55%, 2016-17 मध्ये 8.65% आणि आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 8.8% व्याज मिळाले. होते.
Post Office मध्ये अकाऊंट असेल तर उभारता येतील 20 लाख, कशी कराल गुंतवणूक?
ऑनलाइन शिल्लक तपासा
तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही EPFO च्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर जाऊन तुमची शिल्लक तपासू शकता. या साइटला भेट दिल्यानंतर ई-पासबुकवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल. असे केल्याने, तुम्हाला पीएफ खात्याशी संबंधित माहिती दिसू लागेल. येथे तुम्हाला मेंबर आयडी दिसेल. तुम्ही ते निवडल्यास, तुम्हाला ई-पासबुकवर तुमचा पीएफ शिल्लक दिसू लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Epfo news, Investment, Money, PF Withdrawal