Home /News /money /

Petrol Diesel Prices today : आज पुन्हा पेट्रोल दरवाढ, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव

Petrol Diesel Prices today : आज पुन्हा पेट्रोल दरवाढ, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव

सरकारी तेल कंपन्यांनी आजही 80 पैसे प्रति लीटर इतकी पेट्रोल दरवाढ केली आहे. काल शनिवारीही पेट्रोल दरात वाढ झाली होती.

    नवी दिल्ली, 4 एप्रिल : पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. आज रविवारीही पेट्रोल-डिझेल महाग (Petrol-Diesel Price Today) झालं आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजही 80 पैसे प्रति लीटर इतकी पेट्रोल दरवाढ केली आहे. काल शनिवारीही पेट्रोल दरात वाढ झाली होती. जवळपास 10 ते 15 दिवसांपासून इंधन (Petrol-Diesel Price Hike) दर सतत वाढता आहे. यादरम्यान दररोज जवळपास 80 पैशांची वाढ होत आहे. आज पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात वाढ केली आहे. याआधी मागील चार महिन्यांपासून इंधन दर स्थिर होता. तेल कंपन्यांनी मागील 10 दिवसांत पेट्रोल किमतीत 7 रुपयांहून अधिक वाढ केली आहे. तर डिझेलचा भावही जवळपास इतकाच वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल 102 रुपयांवर आहे. तर मुंबईत पेट्रोल 118 रुपये लीटरजवळ पोहोचलं आहे. डिझेल 100 रुपयांवर आहे. पुण्यात पेट्रोल 117.87 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलने शंभरी पार केली आहे. पुण्यात डिझेल 100.60 रुपये प्रति लीटर इतकं झालं आहे. चार महानगरातील पेट्रोल-डिझेल दर - – दिल्लीत पेट्रोल 103.41 रुपये आणि डिझेल 94.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 118.41 रुपये आणि डिझेल 102.64 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 108.96 रुपये आणि डिझेल 99.04 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 113.03 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लीटर असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    हे वाचा - महागाईचा भडका सुरूच! डाळ, तांदूळ, बिस्किटं, मसाल्यांसह या वस्तू महागल्या; पाहा किती वाढल्या किमती

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and diesel prices continued to rise

    पुढील बातम्या