मराठी बातम्या /बातम्या /मनी /Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, 'या' जिल्ह्यांमध्ये स्वस्त झालं इंधन

Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण, 'या' जिल्ह्यांमध्ये स्वस्त झालं इंधन

Petrol Diesel Prices :  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे काय आहेत दर

Petrol Diesel Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे काय आहेत दर

Petrol Diesel Prices : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पाहा तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे काय आहेत दर

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती सध्या चांगली नाही. अशा परिस्थितीमध्ये भारताची अर्थव्यवस्था अजूनही स्थिर आणि चांगली आहे. भारतासाठी चांगली बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. भारत सर्वाधिक कच्चे तेल आयात करणारा देश आहे. परिणामी काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

जागतिक बाजारात शनिवारी कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज डब्ल्यूटीआय क्रूड 2.49 डॉलर म्हणजेच 3.28 टक्क्यांनी घसरून 73.39 डॉलर प्रति बॅरलवर आलं आहे. क्रूड ऑईल 2.49 डॉलरने घसरलं आहे. देशातील तेल कंपन्यांनी देखील पेट्रोल डिझेलच्या दरात बदल केला आहे.

राजस्थानमध्ये पेट्रोल 71 पैशांनी स्वस्त झालं असून लिटरमागे ग्राहकांना 108.17 रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरात 64 पैशांनी घट झाली असून त्याचा दर 93.44 रुपये प्रति लीटर झाला आहे. पंजाबमध्येही पेट्रोल 28 पैशांनी तर डिझेल 27 पैशांनी स्वस्त झालं आहे.

16 फेब्रुवारीपर्यंत करा 'हे' काम, कमी जोखिमेसह मिळेल जबरदस्त परतावा!

तेलंगणातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल 95.43 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.80 रुपये प्रति लिटरने 28 पैशांनी महागले आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 44 पैशांनी 107.26 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 41 पैशांनी घसरून 93.90 रुपये प्रतिलिटरवर दर पोहोचले आहेत.

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.75 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर

रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात. यावर उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर खर्च जोडून हे दर ग्राहकांना पेट्रोल पंपावर दिसतात. वाढत्या महागाईत क्रूड ऑइलचे दर घसरल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमतीही घसरतील अशी एक आशा आहे.

Budget 2023: 10 पॉइंट्समध्ये संपूर्ण बजेट; कोणत्या घोषणांचा तुमच्यावर थेट परिणाम होईल

तुम्हाला जर पेट्रोल डिझेलचे दर तपासायचे असतील तर तुम्ही घसबसल्या फोनवरुन चेक करु शकता. तुम्हाला फक्त एक SMS करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या विभागातील दर माहिती होतील. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut, Petrol Diesel hike