मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Prices: पेट्रोल-डिझेलची किमत आज वाढली की कमी झाली? कंपन्यांकडून दर जारी

Petrol-Diesel Prices: पेट्रोल-डिझेलची किमत आज वाढली की कमी झाली? कंपन्यांकडून दर जारी

File Photo

File Photo

आंतरराष्ट्रीय बाजारात महागडे क्रूड आणि देशातील महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारसमोर कठीण परिस्थिती आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 9 जून : वाढत्या क्रुड किमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र आज दरात कोणतीही वाढ झालेली नाही. आज गुरुवारी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि मुंबईत111.35 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. बाजारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात महागडे क्रूड आणि देशातील महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे किंवा वाढवणे सरकारसमोर कठीण परिस्थिती आहे.

मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे. तर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर, चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर, कोलकाता येथे पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकलं जातंय.

इथेनॉल मिश्रित पेट्रोल नेमकं कसं असतं? वाहनांसाठी ते फायदेशीर की हानिकारक?

राज्यातील प्रमुख शहरांतील दर

>> मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर

>> पुणे - पेट्रोल 111.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.58 रुपये प्रति लीटर

>> ठाणे- पेट्रोल 110.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.25 रुपये प्रति लीटर

>> नाशिक- पेट्रोल 111.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.70 रुपये प्रति लीटर

>> नागपूर- पेट्रोल 111.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.14 रुपये प्रति लीटर

>> औरंगाबाद- पेट्रोल 111.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.16 रुपये प्रति लीटर

>> जळगाव- पेट्रोल 112.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर

>> कोल्हापूर- पेट्रोल 111.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.54 रुपये प्रति लीटर

सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Repo Rate Hike: रेपो रेट वाढीनंतर घर आणि कार लोनचा EMI किती वाढणार? कॅल्क्युलेशन पाहा

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel price, Petrol price hike