जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol Diesel Prices: आज किती रुपयांना विकलं जातंय पेट्रोल-डिझेल, चेक करा नवे दर

Petrol Diesel Prices: आज किती रुपयांना विकलं जातंय पेट्रोल-डिझेल, चेक करा नवे दर

Petrol Diesel Prices: आज किती रुपयांना विकलं जातंय पेट्रोल-डिझेल, चेक करा नवे दर

मुख्य आर्थिक सल्लागारांनी गेल्या महिन्यात एका निवेदनात म्हटले होते की, जोपर्यंत क्रूडची किंमत प्रति बॅरल 110 डॉलरपेक्षा कमी आहे, तोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 मे : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात रविवारीही कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असताना तेल पुन्हा महाग होण्याची शक्यता बळावली आहे. आजही दिल्ली, मुंबई आणि देशातील प्रमुख शहरांसह चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मुख्य आर्थिक सल्लागारांनी गेल्या महिन्यात एका निवेदनात म्हटले होते की, जोपर्यंत क्रूडची किंमत प्रति बॅरल 110 डॉलरपेक्षा कमी आहे, तोपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत. कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलरच्या वर राहिल्यास सरकार, तेल कंपन्या आणि ग्राहकांना मिळून त्याचा भार सहन करावा लागेल. अशा परिस्थितीत आज जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 110 डॉलरच्या वर पोहोचल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होण्याची शक्यता आहे. नवीन घर खरेदीदारांना झटका; HDFC बँकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी वाढ, EMI वाढणार चार महानगरात पेट्रोल-डिझेल दर » मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर » दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर » चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर » कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. New IPO : LIC नंतर ‘या’ 3 आयपीओंमधून गुंतवणूकदारांना कमाईची संधी, पुढील आठवड्यात ओपन होणार देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात