जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol, Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल अन् डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा सविस्तर

Petrol, Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल अन् डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा सविस्तर

Petrol, Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल अन् डिझेलचे आजचे दर जाहीर, वाचा सविस्तर

Petrol, Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, पेट्रोल अन् डिझेलचे आजचे दर जाहीर, वाचा सविस्तर

Petrol, Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना गेल्या चार महिन्यांपासून देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 ऑगस्ट: आज, बुधवारी, 10 ऑगस्ट 2022 रोजी देशात पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol, Diesel Price Today) कोणताही बदल झालेला नाही. सर्व दर पूर्वीप्रमाणेच स्थिर आहेत. गेल्या चार महिन्यांपासून देशातील सरकारी तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. ब्रेंट क्रूड 100 डॉलरच्या खाली आले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये आजही पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटर दरानं विकलं जात आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, पाटणा, जयपूर अशा अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा जास्त दराने विकलं जात आहे. कच्च्या तेलाच्या किमतींबद्दल बोलायचं झाल्यास बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीच्या परिणामामुळे ब्रेंट क्रूडच्या किमतीत घसरण दिसून आली. ब्रेंट क्रूड फ्युचर्स 6 सेंटने घसरून 96.25 डॉलर्स प्रति बॅरलवर व्यवहार करत होते. यू.एस. डब्ल्यूटीआय क्रूड फ्युचर्स 16 सेंटने घसरून 90.34 डॉलर्स प्रति बॅरल होते. देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल अन् डिझेलचे दर- शहर – पेट्रोल - डिझेल दिल्ली-  96.72,  89.62 कोलकाता-  106.03,  92.76 मुंबई-  106.35,  94.28 चेन्नई-  102.63, 94.2 हेही वाचा-  Credit Card खिशात घेऊन फिरता? ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी नाहीतर… पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर कसे तपासता येतील? तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात