Home /News /money /

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा तुमच्या शहरातील एक लीटरचा भाव

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा तुमच्या शहरातील एक लीटरचा भाव

सरकारी तेल कंपन्यांनी 22 मार्चनंतर आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल किमतीत 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली केली आहे. परंतु आज रविवारी सलग चौथ्या दिवशी तेल कंपन्यांनी किमतीत कोणतेही बदल केलेले नाहीत.

    नवी दिल्ली, 10 एप्रिल : सरकारी तेल कंपन्यांनी आज रविवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price Today) जारी केले आहेत. आज तेल कंपन्यांनी कोणतेही बदल केलेले नाहीत. सरकारी तेल कंपन्यांनी 22 मार्चनंतर आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल किमतीत 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली केली आहे. परंतु आज रविवारी सलग चौथ्या दिवशी तेल कंपन्यांनी किमतीत कोणतेही बदल केलेले नाहीत. दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आहे. यापूर्वी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर गेल्यानंतर तेल कंपन्यांनी आपला तोटा भरुन काढण्यासाठी किमती वाढवल्या होत्या. 16 दिवसांत 14 वेळा किमती वाढवल्या (Petrol Diesel Price Hike) आहेत. चार महानगरात पेट्रोल-डिझेलचे दर - – दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर – चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

    हे वाचा - जगभरात LPG ची सर्वांत जास्त किंमत भारतात, काय आहेत त्यामागची कारणं समजून घ्या

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते. दरम्यान, पेट्रोल-डिझेलला स्वस्त पर्याय म्हणून असलेल्या सीएनजीमध्येही मोठी वाढ झाली आहे. मुंबईत CNG तब्बल 7 रुपयांनी महाग (CNG Price Hike Mumbai) झालं आहे. मुंबईतील सीएनजीचा भाव 67 रुपये किलो इतका आहे. पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीमध्येही वाढ झाल्याने वाहनधारकांना महागाईचा, इंधन दरवाढीचा मोठा तिहेरी झटका बसला आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Petrol price

    पुढील बातम्या