जाहिरात
मराठी बातम्या / मनी / गुडन्यूज! गुढीपाडव्याआधी स्वस्त झालं पेट्रोल, आजच टाकी फुल्ल करून घ्या

गुडन्यूज! गुढीपाडव्याआधी स्वस्त झालं पेट्रोल, आजच टाकी फुल्ल करून घ्या

गुडन्यूज! गुढीपाडव्याआधी स्वस्त झालं पेट्रोल, आजच टाकी फुल्ल करून घ्या

कच्च्या तेलाचे दर घसरले, गुढीपाडव्याआधी स्वस्त झाले पेट्रोल डिझेलचे दर, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : गुढीपाडव्याआधी एक गुडन्यूज आहे. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने पेट्रोल डिझेल देखील स्वस्त झालं आहे. वाढत्या महागाईत पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला जर कुठे बाहेर जायचा प्लॅन असेल तर आजच टाकी फुल्ल करून घ्या. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून खाली उतरत असल्याचं दिसत आहे. ब्रेंट क्रूड डॉलर 73 च्या आसपास पोहोचले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून आला आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे पेट्रोल २४ पैशांनी स्वस्त झालं असून ९६.७६ रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. डिझेल येथे २१ पैशांनी घसरून ८९.९३ रुपये प्रति लीटर मिळत आहे. आज एनसीआरमधील अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमतीत नरमाई दिसून आली. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेलाचे दर स्थिर आहेत.

पेट्रोल-डिझेल GSTच्या कक्षेत येणार? केंद्र सरकार तयार, राज्यांच्या भू्मिकेकडे लक्ष

दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

News18लोकमत
News18लोकमत

रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसते.

60 डॉलरपेक्षा जास्त दराने तेल विकण्यास बंदी, भारताला फायदा होणार का?

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला SMS द्वारेही मिळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्यासोबतच HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात